शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
3
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
4
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
5
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
6
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
7
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
8
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
9
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
10
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
11
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
12
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
13
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
14
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
15
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
16
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
17
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
18
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
19
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
20
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!

'मी बेकायदेशीर तर निवडून आलेले सर्व आमदार बेकायदेशीर'; जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 7:52 PM

Election Commission on NCP : 'शरद पवारांच्या कार्यशैलीतून ही लोकं मोठी झाली, आता शरद पवारांना प्रश्न विचारत आहेत.'

Election Commission on NCP : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केल्यानंतर पक्षावर दावा केला आहे. याप्रकरणी आज निवडणूक आयोगात सुनावणी झाली. सोमवारी चार वाजता पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीत अजित पवार गटाकडून जयंत पाटलांची (Jayant Patil) नियुक्ती बेकायदेशीर होती, असा युक्तीवाद करण्यात आला. यावर आता स्वतः जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी केला. तसेच सुनील तटकरे हेच राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, असा दावाही त्यांनी केला. यावर जयंत पाटील म्हणाले की, माझी  नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या उमेदवारांना माझ्या सहीनेच एबी फॉर्म देण्यात आले होती. जर मी बेकायदेशीर असेल, महाराष्ट्रातून सगळे निवडून आलेले आमदारदेखील बेकायदेशीर ठरवण्याचा काहीतरी डाव दिसतो. 

संबंधित बातमी- अजित पवार गटाने मृत व्यक्तींची कागदपत्रे सादर केली; शरद पवार गटाचा आरोप

मी निवडणुकीने निवडून आलेलो आहे, मी निवडून आल्यानंतर प्रफुल पटेल यांनीच मला पत्र दिले होते. संख्याबळबाबत आमचे वकील युक्तिवाद करतील. पहिल्यांदा जेव्हा घटना झाली, तेव्हा या 24 लोकांनी शरद पवारांना पाठिंबा दिला होता. पण यानंतर अजित पवार गटाने कोणाला नियुक्ती दिली असेल आणि त्यांचे त्यांना समर्थन असेल, निवडणूक आयोगाने पूर्वी अध्यक्ष कोण होते हे विचारात घेऊन निर्णय द्यावा, असं जयंत पाटील म्हणाले.

पाटील पुढे म्हणाले, पंचवीस वर्षे तुम्ही शरद पवारांसोबत काम केले. पंचवीस वर्षानंतर तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात आली असेल, तर त्याच्याबद्दल शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. इतक्या उशिरा का लक्षात आले? पक्षांतर्गत निवडणुका ज्यावेळी झाल्या, त्यावेळेस असा प्रश्न कोणी विचारला नाही. चिन्ह गोठवण्याचा प्रश्न येत नाही, कारण पक्ष आणि चिन्ह शरद पवार यांचा आहे. एखाद्याने उद्या भाजपच्या चिन्हबद्दल प्रश्न उपस्थित केला तर ते तुम्ही गोठावणार का?

शरद पवार संस्थापक आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली चालवलेल्या पक्षाला आतापर्यंत कोणीही चॅलेंज केलेले नाही. त्यांना सर्वांनी सर्वाधिकार दिलेले होते, हात उंचावून, त्याचे क्लिप सर्वांकडे आहेत. चिन्ह गोठवणे हे अन्यायकारक होईल. चिन्ह गोठण्याची एक पद्धत आहे, पण आमच्या वकिलांनी सांगितले की चिन्ह गोठवू नका. शरद पवार यांच्या कार्यशैलीतून हे लोक मोठी झाली आहे, तीच लोक आता शरद पवार यांना प्रश्न विचारत आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष