मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांनी कंबर कसली आहे. त्यातच मुंबई भाजपाने महापालिका निवडणुकीसाठी २९ सदस्यीय निवडणूक समितीची घोषणा रविवारी केली. मुंबई महापालिका निवडणुकाची तयारी, व्यवस्थापन, प्रचार साहित्य वाटप, प्रचारसभा तसेच उमेदवार निवड आणि जाहीरनामा प्रकाशनासह इतर कामांच्या दृष्टीने ही समिती काम करणार आहे. समितीमध्ये संघटनमंत्री सुनील कर्जतकर यांच्यासह केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मंत्री विनोद तावडे, प्रकाश महेता, विद्या ठाकूर, खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, आमदार अतुल भातखळकर, मंगल प्रभात लोढा, भाई गिरकर, राज पुरोहित, योगेश सागर, प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड, आमदार प्रवीण दरेकर, मुंबई भाजपा महामंत्री सुनील राणे, अमरजीत मिश्रा, सुमंत घैसास, महिला मोर्चा अध्यक्षा शलाका साळवी, महापालिका गटनेते मनोज कोटक, शायना एन. सी., संजय उपाध्याय, संजय पांडे, तर प्रवक्ते म्हणून आमदार राम कदम, अतुल शाह, मधू चव्हाण यांचा समावेश आहे. शिवाय प्रताप आशर आणि कांता नलावडे या ज्येष्ठ सदस्यांचाही समितीत समावेश आहे. (प्रतिनिधी)
मुंबई भाजपाची निवडणूक समिती जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2017 2:29 AM