पुणे : आतापर्यंत केवळ लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये वापरण्यात येणारी ईव्हीएम मशिन आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्येही वापरण्यात येणार आहे. यानुसार राज्यातील पहिली पथदर्शी निवडणूक पुण्यातील एका कामगार सहकारी पतपेढीत घेतली जाणार आहे. तेथे सर्व मतदान ईव्हीएम मशिनवर घेण्यात येणार आहे.राज्यात सुमारे सव्वादोन लाख सहकारी संस्था आहेत. त्यांच्या निवडणुका सातत्याने सुरू असतात. त्या राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणामार्फत घेण्यात येतात. या निवडणूका घेण्यासाठी मोठा फौजफाटा लागतो आणि खूप दिवसही जातात. तंत्रज्ञानाची मदत घेत हे टाळण्यासाठी प्राधिकरणाकडून ईव्हीएम मशीनवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबतची बातमी सर्वप्रथम ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्याचाच पहिल्या टप्प्यात पुण्यात प्रत्यक्षात निवडणूक ईव्हीएम मशीनवर घेतली जाणार आहे. बुधवार पेठेतील कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या सहकारी पतपेढीची निवड या पहिल्या ईव्हीएम मशीनवरील निवडणुकीसाठी करण्यात आली आहे. या आठवड्यात ही निवडणूक होणार आहे. शासकीय निवडणुकांसाठी लागणाऱ्या मशीन्स या केंद्र शासनाच्या मालकीच्या इलेक्ट्रॉनिक कॉपोर्रेशन आॅफ इंडिया कंपनीकडून पुरविण्यात येत आहेत.यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्येही पारदर्शकता येणार आहे. नवीन तंत्रज्ञानानुसार ही सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी सूचना उपलब्ध करणारी पुणे राज्यातील पहिले शहर ठरणार आहे. त्यानंतर इतर ठिकाणी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)>४सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक असलेल्या मशिन्स घेण्याबाबत चर्चा झाली आहे. याचबरोबर काही खासगी संस्थांमध्ये निवडणुकींसाठी खासगी कंपनींकडून ईव्हीएम मशिन्स वापरण्यात आल्या होत्या. त्या खासगी कंपनींकडूनही सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी मशिन्स मिळू शकतात का, याबाबतही पडताळणी सुरू आहे.
पुण्यात ‘ईव्हीएम’वर निवडणूक
By admin | Published: April 28, 2016 2:06 AM