ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांआधी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपानं शिवाजी महाराजांचं नाव घेत जाहिरातबाजी करत जनतेला विजय मिळवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र विजयानंतर भाजपाला शिवाजी महाराजांचा विसर पडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. महापालिकांसह जिल्हा परिषदांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपा नेत्यांच्या डोक्यात हवा गेल्याचं दिसत आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि रावसाहेब दानवेंना शिवरायांचा विसर पडला आहे. निवडणुकांआधी शिवरायांचा जप करणा-या नेत्यांनी विजयानंतर शिवरायांबद्दल अवाक्षरही काढलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकदा, दोनदा नव्हे, तर चारदा नरेंद्र मोदींच्या पारदर्शी कारभारावर जनतेनं विश्वास दाखवत विजय मिळाल्याचं म्हणाले आहेत. मात्र त्यांनी एकदाही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही. तसेच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनाही विजयाची नशा चढली असून, त्यांनीही शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना एकदाही शिवरायांची आठवण झाली नाही. (BMC ELECTION RESULTS : मुंबईत सेनेची वाढ फुटपट्टीत, तर भाजपाची पटींनी- आशिष शेलार)(BMC ELECTION RESULTS : राज-उद्धव एकत्र येणार नाहीत - मनोहर जोशी)तत्पूर्वी समुद्रातील शिवस्मारकाच्या उद्घाटनावेळी शिवस्मारक व्हावे, हीच बाळासाहेबांची इच्छा असा संदेश असणारे पोस्टर जागोजागी लावण्यात आले होतं. त्यावेळी शिवसेनेनं भाजपावर टीका केली होती. भाजपा या स्मारकाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी धडपडत आहे. शिवराय हे आमचे दैवत आहेत आणि त्यांना आमच्यापासून कोणीही दूर नेऊ शकत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली होती.
ELECTION RESULT-शिवरायांच्या आशीर्वादाचा मुख्यमंत्र्यांसह भाजपा नेत्यांना विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2017 6:12 PM