ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - मुंबईकर मतदारांनी शिवसेनेला भरीव यश मिळवून देऊन नंबर 1चा पक्ष बनवला आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महापालिका निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर ते बोलत होते. मुसलमान मतदारही शिवसेनेकडे वळले असून, वांद्र्यातल्या बेहराम पाड्यात शिवसेनेनं विजय मिळवला आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. नाशिकमध्ये मतदारांची नावं गायब होणं हा मोठा घोळ आहे. मतदारांचा अधिकार कोणीच हिरावून घेऊन शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाला जबाबदार असलेल्या कोणालाही शिक्षा झालीच पाहिजे. या मागे षड्यंत्र आहे का हेही आधी तपासून पाहिलं पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मतदार यादीतील घोळावर चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांत भाजपानं पूर्ण ताकद पणाला लावली होती. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावरच भाजपानं हे यश मिळवलं आहे.
(BMC ELECTION RESULTS : मुंबईत सेनेची वाढ फुटपट्टीत, तर भाजपाची पटींनी- आशिष शेलार)(BMC ELECTION RESULTS : राज-उद्धव एकत्र येणार नाहीत - मनोहर जोशी)तसेच काही ठिकाणी आमच्या फार थोड्या मतांनी जागा गेल्या आहेत. विधानसभेनंतर वातावरणात फरक पडायला लागला आहे. मुंबईकरांच्या आशीर्वादामुळेच आम्ही यश मिळवू शकलो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या उत्तरावर भाजपाची प्रतिक्रियाभाजपाला महाराष्ट्रासह मुंबईत मिळालेल्या यशावर शिवसेनेचा जळफळाट होतोय. शिवसेनेला स्वतःचं अपयश पचवता येत नसल्याची टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
Not only Mumbai mayor, but next Chief Minister will also be from Shivsena: Uddhav Thackeray pic.twitter.com/dhrH3Wr7CI— ANI (@ANI_news) February 23, 2017