लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन पद्धतीने तपासल्यास निकालास होणारा उशीर टाळता येईल, असा विश्वास फोल ठरल्याने, मंगळवारी राज्यपाल विद्यासागर राव यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची कानउघडणी केली. विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने, ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याची तंबी राज्यपालांनी दिली आहे. निकाल लवकर लावण्यासाठी वॉर रूम उभारावे आणि पेपर तपासणीबाबत रोजच्या रोज शासनाला अहवाल सादर करावा, असे निर्देशही राज्यपालांनी कुलगुरूंना दिल आहेत. ं2016-17परीक्षांचे निकालच जाहीर न झाल्याने, विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक वर्षच सुरू झालेले नाही. कुलगुरू डॉ. संजय देशमुख आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक, नियंत्रक दीपक वसावे यांच्या ढिसाळ कारभाराची दखल घेत दोघांवर कारवाई करावी, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली.
‘३१ जुलैपर्यंत परीक्षांचे निकाल जाहीर करा’
By admin | Published: July 05, 2017 5:18 AM