शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

विधानसभा अध्यक्षांची निवड : राज्यपालांचा ‘तो’ अधिकार केवळ पहिल्या विधिमंडळ अधिवेशनापुरताच

By यदू जोशी | Published: February 19, 2021 4:37 AM

Governor : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य विधानमंडळ सचिवालयाला एक पत्र पाठविले असून, रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक १ मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घ्यावी, असे त्यात म्हटले आहे.

- यदु जोशी

मुंबई :  नव्या विधानसभेचे पहिले अधिवेशन बोलावताना राज्यपाल अध्यक्षांची निवड अमुक दिवशी व्हावी, असे सांगू शकतात. परंतु, त्यानंतर कोणत्याही कारणाने ते पद रिक्त झाल्यास ते भरण्यासाठी निवडणूक केव्हा घ्यायची, हा पूर्णपणे सभागृहाच्या अखत्यारीतील विषय आहे. राज्यपाल ही निवडणूक घेण्याबाबत सरकारला केवळ संदेश पाठवू शकतात,  ते ऐकणे विधानसभेवर व सरकारवर बिलकूल बंधनकारक नाही. घटनात्मक तरतुदी बघता ही माहिती समोर आली.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य विधानमंडळ सचिवालयाला एक पत्र पाठविले असून, रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक १ मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घ्यावी, असे त्यात म्हटले आहे.संविधानाचा अनुच्छेद १७८ हा  विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीसंबंधीचा आहे. त्यात फक्त एवढेच म्हटले आहे की, प्रत्येक राज्याच्या विधानसभेने आपल्यापैकी दोन सदस्यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड करावी. यासाठी ‘शक्यतो लवकर’ असा शब्दप्रयोग वापरण्यात आला आहे. ही तरतूद मुख्यत: निवडणुकीनंतर अस्तित्वात येणाऱ्या  नव्या विधानसभेसंबंधी आहे. नव्या विधानसभेच्या सदस्यांना शपथ देण्यासाठी राज्यपालांकडून नेमले जाणारे हंगामी अध्यक्ष (प्रो-टेम स्पीकर) फक्त तेवढ्याच कामासाठी असतात. त्यामुळे सदस्यांचा शपथविधी होऊन नवी विधानसभा रीतसर अस्तित्वात आल्यावर त्या सभागृहाला कायमस्वरूपी अध्यक्ष व उपाध्यक्ष निरंतर स्वरूपात असावेत, हा त्यामागचा हेतू आहे. 

दोन्ही पदे रिक्त असतील तर राज्यपालांची भूमिका -अध्यक्ष नसल्यास उपाध्यक्ष त्यांचे काम करू शकतात. परंतु, अध्यक्ष व उपाध्यक्ष दोघेही नसल्यास सभागृहाचे कामकाज चालू शकत नाही. - कदाचित म्हणूनच सभागृह नव्याने अस्तित्वात आल्यावर अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीच्या संदर्भात शक्यतो लवकर, असा शब्दप्रयोग केला गेला असावा. दोन्ही पदे रिक्त असतील तर अध्यक्षांची नियुक्ती राज्यपाल करू शकतात.

संवैधानिक बंधन नाही नाना पटोले यांनी अध्यक्षपद सोडले, त्याला अद्याप १५ दिवसही झालेले नाहीत. राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन १ मार्चपासून मुंबईत बोलावले आहे. त्याच अधिवेशनात नवा अध्यक्ष निवडलाच पाहिजे, असे कोणतेही संवैधानिक बंधन नाही. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ पदावर असल्याने रीतसर अध्यक्ष नसतानाही विधानसभेचे अधिवेशन होऊ शकते. अध्यक्षांचे पद रिकामे असताना त्यांचे सर्व अधिकार उपाध्यक्षांकडे येतात. रिक्ततेच्या पूर्ततेविषयी संविधान काहीही सांगत नाही.

तुमचा आपल्याच आमदारांवर विश्वास नाही का? : फडणवीसविधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यासाठी सरकार मागे-पुढे का पाहते, सरकारचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही का, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. आपल्याच आमदारांना घाबरणारं सरकार मी पहिल्यांदाच पाहत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी