शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने, दगाफटका टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 10:36 AM

Mahavikas Aghadi Government : विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड आवाजी मतदानाने करण्यात येणार आहे. आतापर्यंत गुप्त मतदानाद्वारे होणारी ही निवड आवाजी मतदानाने करण्याची नवी रणनीती महाविकास आघाडी सरकारने आखली आहे.

मुंबई : विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड आवाजी मतदानाने करण्यात येणार आहे. आतापर्यंत गुप्त मतदानाद्वारे होणारी ही निवड आवाजी मतदानाने करण्याची नवी रणनीती महाविकास आघाडी सरकारने आखली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.पटोेले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा गेल्या फेब्रुवारीत दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. काँग्रेसच्या कोट्यात असलेले पद ११ महिन्यांपासून भरता आलेले नाही. अध्यक्षपदाच्या निवडीत कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून निवड आवाजी मतदानाने केली जाईल. या संबंधीचे विधेयक विधिमंडळाच्या २२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आणून ते मंजूर केले जाईल व नंतर अधिवेशनातच अध्यक्षपदाची निवड घेतली जाईल. महाविकास आघाडी सरकारकडे १७० सदस्यांचे संख्याबळ विधानसभेत आहे. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार निवडून देण्यात कुठलीही अडचण नाही. त्यातच भाजपचे १२ सदस्य निलंबित आहेत. त्यात गिरीश महाजन, जयकुमार रावल, डॉ. संजय कुटे, आशिष शेलार, योगेश सागर, नारायण कुचे, अतुल भातखळकर, हरिश पिंपळे, पराग अळवणी, राम सातपुते, अभिमन्यू पवार, कीर्तीकुमार भांगडिया यांचा समावेश आहे. तरीही कुठलीही जोखीम नको म्हणून विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे.  विधानसभा नियम समितीच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत या संबंधीचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. आता विधानसभेत ठराव मांडून नियमात सुधारणा केली जाईल. समितीच्या बैठकीत भाजपचे डॉ. संदीप धुर्वे यांनी प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला गेल्या फेब्रुवारीमध्ये एक पत्र लिहून मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड करा, असे सांगितले होते. मात्र तरीही निवड झाली नाही.  

विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड ही आवाजी मतदानाने केली जाईल. त्यासाठीचे सुधारणा विधेयक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आणू. इतर काही राज्यांमध्येदेखील हीच पद्धत आहे. त्यात गैर काहीही नाही.     - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने करणे म्हणजे नियमांना तिलांजली देवून मनमानी सुरू असल्याचे लक्षण आहे. संपूर्ण बहुमताचा दावा करणारे लोकशाहीचा खून करायला निघाले आहेत. यातच तीन पक्षांमध्ये परस्पर किती अविश्वासाचे वातावरण आहे हे सिद्ध होते.        - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेता, विधानसभा

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार