शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

मीरा भाईंदरमधील दोन प्रभागात पोटनिवडणुकीचे बिगुल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 9:10 PM

भाईंदर व मीरारोड येथील दोन प्रभागात पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाच्या आदेशा नंतर तेथे महापालिकेने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदर व मीरारोड येथील दोन प्रभागात पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाच्या आदेशा नंतर तेथे महापालिकेने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे . 

भाईंदर पूर्वेच्या प्रभाग १० ड मधून २०१७ साली निवडून आलेले शिवसेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे गेल्या वर्षी कोरोना मुळे निधन झाले होते . त्यामुळे सदरची जागा रिक्त झाली आहे . जेणे करून सेनेचे संख्याबळ सुद्धा १ ने घटले आहे . 

मीरारोडच्या नया नगर भागातून प्रभाग २२ अ मधून काँग्रेसच्या उमा सपार ह्या २०१७ साली बिनविरोध निवडून आलेल्या होत्या . त्यांचे काही महिन्या पूर्वी आजारपणाने निधन झाल्याने ती जागा सुद्धा रिक्त आहे . महापालिकेची मुदत पुढील वर्षी ऑगस्ट मध्ये संपुष्टात येत आहे .  तर निवडणूक आयोगाने दोन्ही मतदार संघातून पोटनिवडणूक घेण्याच्या अनुषंगाने मतदार यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत . 

त्या अनुषंगाने महापालिका शुक्रवार १२ नोव्हेम्बर रोजी ह्या दोन्ही प्रभागातील प्रारूप मतदार यादी जाहीर करणार आहे . त्या प्रारूप यादीवर १२ ते १६ नोव्हेंबर पर्यंत हरकती , सूचना देता येणार आहेत . १७ रोजी प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून २२ रोजी मतदार केंद्रांची यादी प्रसिद्ध केली जाईल . त्या नंतर १२ मार्च २०२२ रोजी मतदान केंद्र निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे . त्यामुळे ह्या दोन्ही पोटनिवडणूक पुढील वर्षी होणार असून पुढील वर्षीच होणाऱ्या पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागण्याची शक्यता आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरElectionनिवडणूक