मुंबई : भाजपा निवडणुकांच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करेल, हे आधीच सांगितल्याची आठवण करून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राइकवर संशय व्यक्त केला. निवडणुकांआधी आणखी एक हल्ला होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. मनसेच्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.ठाकरे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा कार्यकर्त्यांचा ठाकरे शैलीत समाचार घेतला. जवानांच्या शौर्यावर संशय नसून सरकारच्या माहितीवरच विश्वास नाही. हल्ल्याची पूर्वसूचना मिळूनही एअरलिफ्ट करण्याऐवजी जवानांना त्या धोकादायक रस्त्यावरून पाठवले. एअर स्ट्राइकमध्ये १० लोकही मेले नाहीत. जवानांचा हकनाक बळी गेल्यानंतरही कुणी साधा प्रश्नही उपस्थित करायचा नाही का, असा सवाल त्यांनी केला. मेक इन इंडिया, स्टार्ट अप, दाऊदचे प्रत्यार्पण, राम मंदिर या सर्व मुद्द्यांवर अपयशी ठरल्याने अशा घटना घडवल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पाकिस्तानचे १० लोक जरी मारले असते, तरी इम्रान खान यांनी कॅप्टन अभिनंदन यांना सोडले नसते. त्यामुळे भाजपाकडून केले जाणारे सर्व दावे साफ खोटे आहेत, असे ते म्हणाले.ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा!सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना ठोकून काढा, असे आदेशही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले. मुद्द्याला मुद्द्याचा विरोध असेल, तर ठीक आहे. मात्र शिव्या देणाºया ट्रोलर्सला पुरावे तपासत घरातून बाहेर काढून ठोकून काढा, असे राज ठाकरे म्हणाले.पंतप्रधान बेफिकीर!देशात युद्धजन्य परिस्थिती असताना पंतप्रधान कोरियामध्ये पुरस्कार स्वीकारण्यासाठी जात असतील, तर ते बेफिकीर असल्याची टीकाही राज यांनी केली. पुलवामा हल्ल्यापासून एअर स्ट्राइक होईपर्यंत रोज पंतप्रधानांनी बदललेल्या कपड्यांचे फोटोच राज यांनी जाहीर सभेत दाखवले. जवानांहून व्यापारी अधिक शौर्य दाखवतात, असे पंतप्रधानांचे वक्तव्य असलेला व्हिडीओ दाखवत राज यांनी संताप व्यक्त केला.राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्नराफेलच्या दर्जाबाबत प्रश्न नसून त्याचे काम उद्योगपती अनिल अंबानी यांना का दिले?चीनसोबत वाद सुरू असताना चिनी पदार्थांवर बंदी लादण्याची मागणी करणाºया भाजपा कार्यकर्त्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांचा चीनने तयार केलेला पुतळा कसा चालतो?भारतीयांना मारल्यानंतर पाकच्या सैनिकाला आपण सोडणार नसू, तर ३००हून अधिक लोक मारल्यानंतर पाकने अभिनंदनला का सोडले?
निवडणुकीआधी पुलवामासारखा हल्ला पुन्हा घडवला जाईल- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 5:35 AM