लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रिलायन्स कंपनीच्या वीज बॉक्समधून वीजचोरी करणाऱ्या १४ जणांना मंगळवारी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात वीजचोरीबाबत तक्रारी येत असल्याने रिलायन्स अधिकारी आणि शिवाजीनगर पोलिसांनी संयुक्तपणे या ठिकाणी ही कारवाई केली आहे. गोवंडी-शिवाजीनगर परिसरातील अनेक भागांत वीजबिल न भरल्याने रिलायन्सने वीज मीटर बंद केले आहेत. त्यामुळे अनेक रहिवासी हे विजेची चोरी करूनच वीज वापरत आहेत. काही वीजमाफिया अशाच पद्धतीने वीज चोरी करून ती इतर रहिवाशांना भाड्याने देत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात अशाप्रकारे वीजचोरी होत असल्याने वीज वितरक कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शिवाय, अधिकृत जोडणी असलेल्या ग्राहकांनादेखील भुर्दंड भरावा लागत आहे. याच्या तक्रारी रहिवाशांकडून आल्यानंतर ही कारवाई करत १४ जणांना अटक करण्यात आली.
वीजचोरांना अटक
By admin | Published: June 08, 2017 6:43 AM