शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

सहा लाख पुणेकर भरताहेत मोबाईलवरून वीजबिल

By admin | Published: April 29, 2016 1:37 AM

हावितरणने सुरू केलेल्या सुविधेचा लाभ पुण्यातील तब्बल ६ लाख ५९ हजार १३३ ग्राहक घेत आहेत.

पुणे : तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरता यावे, यासाठी महावितरणने सुरू केलेल्या सुविधेचा लाभ पुण्यातील तब्बल ६ लाख ५९ हजार १३३ ग्राहक घेत आहेत. गेल्या महिन्यात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह पुणे परिमंडळातील ६० हजार ९०५ ग्राहकांनी आपल्या मोबाईलची नोंदणी या सुविधेसाठी केली आहे. महावितरणकडून विविध ग्राहकसेवांसह वीजग्राहकांच्या मोबाईलवर मासिक वीजबिलाची माहिती सध्या प्रायोगिक तत्त्वावर एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या सर्वच वीजग्राहकांना वीजबिलाचा एसएमएस पाठविण्यात येत आहे. याशिवाय इमेलची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना इमेलद्वारे वीजबिल पाठविण्यात येत आहे.कॉल सेंटर व्यतिरिक्त महावितरणच्या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अ‍ॅपवर आॅनलाईन बिलभरणा करणाऱ्या वीजग्राहकांनाही संपर्क क्रमांकाची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.या सुविधेचा सर्वाधिक वापर पिंपरी विभागात होत असून, तेथील ९९ हजार ८९ ग्राहकांनी यासाठी नोंदणी केली आहे. त्यापाठोपाठ कोथरूडमध्ये ७९ हजार ५८८, भोसरीमध्ये ५१ हजार ८४९, बंडगार्डनमध्ये ८५ हजार ३०५, शिवाजीनगरमध्ये ५३ हजार ८५७, नगर रोडमध्ये ५६ हजार ९२३, पद्मावतीमध्ये ६० हजार ४५९, पर्वतीमध्ये ७३ हजार ९९३, रास्ता पेठमध्ये ५१ हजार ८२२, तर मंचर, मुळशी व राजगुरुनगर विभागांत एकूण ४६ हजार २४८ वीजग्राहकांनी स्वत:च्या मोबाईल क्रमांकाची महावितरणमध्ये नोंदणी केलेली आहे.