शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

राज्यात अनेक भागांत वीज कोसळून २० जणांचा मृत्यू, दुस-या दिवशीही पावसाने दिला तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 6:09 AM

परतीच्या पावसाने सलग दुस-या दिवशी राज्याच्या अनेक भागांत थैमान घालून शनिवारी २० जणांचा बळी घेतला. वीज कोसळून मराठवाड्यात दहा जणांना जीव गेला.

मुंबई : परतीच्या पावसाने सलग दुस-या दिवशी राज्याच्या अनेक भागांत थैमान घालून शनिवारी २० जणांचा बळी घेतला. वीज कोसळून मराठवाड्यात दहा जणांना जीव गेला. नगरमध्ये ३, विदर्भात २, रायगड व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी २, तर सातारा जिल्ह्यामध्ये एक जण मृत्युमुखी पडला. येत्या २४ तासांत राज्याच्या बहुतांशी भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आजही जोरदार पाऊस कोसळत असताना कडाडणाºया विजांमुळे अंगाचा थरकाप होत होता. मुंबई शहर व उपनगरात पावसामुळे चाकरमान्यांचे घरी जाताना खूप हाल झाले.रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर होता. महाडजवळ किन्हेरी परिसरात वीज अंगावर कोसळून प्रफुल उमेश कदम (३६ , रा. अंबवडे) व दिलीप शंकर साळवी (३८ रा. कुर्ला) हे दोघे मृत्युमुखी पडले.बीडमध्ये धारूर तालुक्यात चारदरी येथे झाडाखाली थांबलेल्या दहा जणांच्या अंगावर वीज कोसळली. त्यातील पाच जण जागीच ठार झाले असून, पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माजलगाव तालुक्यातील लोणगाव शिवारात राधाबाई दामोदर कोळसे (५५) मृत्युमुखी पडल्या.औरंगाबाद जिल्ह्यात ढाकेफळ (ता. पैठण) परिसरातील येळगंगा नदीच्या पुलावरून जात असताना, रामेश्वर दशरथ शेरे या कामगाराचा वीज पडून मृत्यू झाला. जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथे संदीप कचरू सोनवणे हा २२ वर्षीच्या तरुणाचाही विजेने बळी घेतला.पैठण तालुक्यातील रहाटगाव शिवारात झाडाखाली थांबलेल्या यशोदा संदीप फासाटे यांचा वीज अंगावर पडून जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या सत्यभामा आप्पासाहेब फासाटे अत्यवस्थ असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जालना जिल्ह्यात धोपटेश्वर गावात शेतात काम करत असलेल्या चंद्रभागा विष्णू दाभाडे यांचा मृत्यू झाला.मध्य महाराष्ट्रालाही पावसाने झोडपले. नगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे शेतात काम करणाºया कडूबाई उर्फ लता संजय पवार वीज पडून मृत्युमुखी पडल्या, तर १२ महिला जखमी झाल्या़ या जिल्ह्यात आणखी दोघे वीज पडून मरण पावले. सातारा जिल्ह्यात कणूर (ता. वाई) येथील बबन राजपुरे यांचाही वीज पडून बळी गेला.विदर्भात नागपूरसह भंडारा, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. डोणगाव येथे गणेश शंकर पळसकर (३८) यांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. भंडाºयात एकजण दगावला.यांना बसला तडाखामुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, रायगड,मध्य महाराष्ट्रात नगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, तसेच मराठवाड्यात औरंगाबादसह बीड, परभणी, हिंगोली, जालना आणि विदर्भात नागपूरसह अनेक जिल्ह्यांत परतीचा पाऊस कोसळला.आजही मुसळधार?येत्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र