पंकज राऊत,बोईसर- महाराष्ट्र राज्यात सुमारे तीन कोटी वीज ग्राहक असून प्रतिवर्षी सरासरी फक्त चार हजार ग्राहकांच्या तक्रारी विद्युत लोकपालापर्यंत येत असल्याची खंत मुंबईचे विद्युत लोकपाल आर. डी. संख्ये यांनी व्यक्त करून ग्राहकांच्या संख्येच्या तुलने तक्रारीचें प्रमाण खूपच कमी असून वीज ग्राहकांमध्ये जास्तीत जास्त जागृती निर्माण करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केले.विद्युत लोकपाल कार्यालय व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने वीज ग्राहकांसाठी तारापूर, एमआयडीसी मधील टीमा सभागृहात आयोजित केलेल्या न्याय आपल्या दारी या उपक्रमाच्या निमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महावितरणच्या पालघर सर्कलचे अधीक्षक अभियंता डी .आर.पाटील, कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, लोकपालांचे सचिव दिलीप टुंबरे, भालचंद्र पाटील व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, वीजग्राहक सर्वप्रथम आपली तक्रार महावितरणच्या मंडल कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण कक्षाकडे करू शकतात. येथे निराकरण न झाल्यास अथवा समाधान न झाल्यास परिमंडल कार्यालयातील मंचाकडे (सीजीआरएफ) तक्रार करावी. या ठिकाणी दोन महिन्यांत निर्णय लागणे अनिवार्य आहे. येथेही समाधान न झाल्यास ग्राहक विद्युत लोकपालांकडे तक्र ार नोंदवू शकतात. महाराष्ट्रासाठी दोन विद्युत लोकपालाची स्थापना करण्यात आलेली आहे. नागपूर येथील विद्युत लोकपालांकडे विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांचे, तर मुंबई येथील विद्युत लोकपालांकडे उर्वरित महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र आहे. >कोणतेही शुल्क, खर्च लागत नाहीआयजीआरसी, सीजीआरएफ तसेच विद्युत लोकपालांकडे तक्रार करण्यासाठी ग्राहकाला खर्च लागत नाही. वकील, शुल्क, स्टॅम्प व कागदपत्रांची गरज नाही. सध्या कागदावरही ग्राहक या तिन्ही ठिकाणी आपली तक्र ार नोंदवू शकतात. अशी माहितीही त्यांनी दिली.
वीजग्राहक ३ कोटी, तक्रारी चारच हजार
By admin | Published: March 03, 2017 3:07 AM