शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वीजग्राहकांना शॉकच

By admin | Published: October 23, 2016 1:56 AM

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या टाटा आणि रिलायन्स या दोन्ही वीज कंपन्यांच्या वीजदरवाढ संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या टाटा आणि रिलायन्स या दोन्ही वीज कंपन्यांच्या वीजदरवाढ संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आयोगाच्या मान्यतेनुसार, १०० युनिटपर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा देण्यात आला असला तरी पुढील चार वर्षांचा विचार करता रिलायन्सच्या तुलनेत टाटाची वीज स्वस्त आहे. दरम्यान आयोगाने मान्यता दिलेले दर २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षांसाठी लागू राहतील.टाटाच्या ०-१०० युनिट वीजेचा वापर करणाऱ्या चेंजओव्हर निवासी ग्राहकांच्या आणि रिलायन्सच्या ग्राहकांच्या वीज दरात मोठा फरक असणार नाही; अशा रितीने वीजदर निश्चित करण्यात आले आहेत. टाटाचे दरमहा १०० युनिटपर्यंत वीजेचा वापर करणारे बहुतांश निवासी ग्राहक हे रिलायन्सकडून टाटाकडे चेंजओव्हर करून आले असून, त्यांचा वीजदर कमी करण्यात आला आहे. टाटाने आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी सरासरी वीजदरात मागितलेल्या १७ टक्के कपातीऐवजी आयोगाने १.८५ टक्के वाढ मंजूर केली आहे. २०१७-१८, २०१८-१९ या आर्थिक वर्षांत आयोगाने अनुक्रमे सरासरी वीजदर २.२६ आणि २.५१ टक्के वाढविला आहे. २०१९-२० मध्ये सरासरी वीजदर १४.९३ टक्क्यांनी कमी केला आहे. टाटाने २०१७-१८ आणि २०१८-१९ करिता ६ आणि २ टक्के वाढ व २०१९-२० करिता २ टक्के कपातीची मागणी केली होती.रिलायन्सने चालू आर्थिक वर्ष २०१६-१७ करिता सरासरी वीजदरात प्रस्तावित केलेल्या ६ टक्के वाढीऐवजी आयोगाने १.९३ टक्के कपात मंजूर केली आहे. २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या आर्थिक वर्षांमध्ये देखील आयोगाने सरासरी वीजदर अनुक्रमे ०.७६, १.०६, १५.१३ टक्क्यांनी कमी केला आहे. रिलायन्सने या वर्षांसाठी वीजदरांमध्ये ३ टक्के वार्षिक वाढ मागितली होती. रिलायन्सच्या कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी १०१-३०० युनिटचा विचार करता या वर्गवारीत टाटाचे दर रिलायन्सपेक्षा कमी आहेत. परिणामी या वर्गातील टाटाच्या वीजवापरकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. तर ३०१-५०० या युनिटचा विचार करता रिलायन्सचे वीजदर कमी असून, टाटाचे वीजदर अधिक आहेत. शिवाय शेवटच्या म्हणजे ५०० वर युनिट वापरकर्त्यांसाठी टाटाच्या तुलनेत रिलायन्सचे वीज दर कमी असल्याने रिलायन्सच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)टाटाचे वीज दर (रुपयांत)युनिट२०१६-१७२०१७-१८२०१८-१९२०१९-२०१००२.९०३.३३३.६७३.३६१०१-३००५.१७५.९६६.५३५.७६३०१-५००९.५७१०.२११०.३७८.७६५०० वर११.८४१२.७२१२.८५१०.३६रिलायन्सचे वीज दर (रुपयांत)युनिट२०१६-१७२०१७-१८२०१८-१९२०१९-२०१००३.६०३.८८४.१४३.७४१०१-३००७.६५७.७२७.३१६.०४३०१-५००९.०९९.२७९.३०८.८४५०० वर१०.९८११.२४११.३७१०.५४