शहरं
Join us  
Trending Stories
1
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
2
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
3
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
4
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
5
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
6
गोपनीय दौरा; खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा दरेगावी उतरले
7
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
9
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
10
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
11
'कासव'गतीनं नऊ हजारी पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरला किंग कोहली
12
"भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतंय", PCS परिक्षेवरून प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल
13
श्रीकांत शिंदेंनी विना परवानगी महाकाल मंदिराच्या गर्भगृहात केली पूजा; काँग्रेस नेते आक्रमक
14
"बऱ्याच गोष्टी डोक्यात, सध्या काहीही...";फडणवीसांची भेट घेतल्यानंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया
15
ठाकरेंनी सांगोल्यातून कुणाला उतरवले मैदानात?; शहाजीबापू पाटलांचे वाढले टेन्शन!
16
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल घराघरात पोहचवा; उद्धव ठाकरेचं आवाहन
17
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; "शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई एअरपोर्टवर.."
18
लाजवाब! Sarfaraz Khan चा लवचिक अंदाज अन् त्यानं मारलेला कडक फटका बघाच (VIDEO)
19
Yahya Sinwar Death: याह्या सिनवारनंतर हमासची कमान कोण सांभाळणार? 'हे' टॉप ५ लीडर शर्यतीत...
20
ठाकरेसेनेची सत्तारांविरोधात मोठी प्लॅनिंग; थेट भाजपा नेत्याला पक्षात घेणार,२०० गाड्या मुंबईकडे

ट्रान्सफार्मरमधूनच वीजचोरी

By admin | Published: June 27, 2014 12:38 AM

वीजचोरी रोखण्यासाठी लावण्यात आलेले एबी केबल आणि आरमरचा तोड वीजचोरांनी शोधला आहे. आत थेट ट्रान्सफार्मरमधूनच (डीपी) वीज चोरी केली जात आहे. एकप्रकारे समांतर वीज वितरण प्रणाली उभी करण्यात आली आहे.

पोलखोल : एबी केबल आणि आर्मर झाले बेकार कमल शर्मा - नागपूरवीजचोरी रोखण्यासाठी लावण्यात आलेले एबी केबल आणि आरमरचा तोड वीजचोरांनी शोधला आहे. आत थेट ट्रान्सफार्मरमधूनच (डीपी) वीज चोरी केली जात आहे. एकप्रकारे समांतर वीज वितरण प्रणाली उभी करण्यात आली आहे. कारवाई झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी नवीन तार लागतात. लोकमत चमूने शहरातील वेगवेगळ्या भागात पाहणी करून वीजचोरी कशी होत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पारंपरिक पद्धतीने विजेच्या तारांवर हूक टाकून वीजचोरी केली जाते. परंतु या पाहणीत याचे प्रमाण कमी आढळून आले. माहिती काढली असता १५ कोटी रुपये खर्चून एबी केबल आणि आरमरचे जाळे पसरविण्यात आले आहे. त्यामुळे विजेच्या तारांवर हूक टाकून वीजचोरी करणे शक्य नाही. अशा स्थितीत वीज चोरीवर नियंत्रण मिळाले तर मग विजेची चोरी कशी होत आहे. याचे उत्तर शोधण्याच्या दृष्टीने आमची चमू उत्तर नागपुरातील झोपडपट्टीबहुल भागात पोहोचली. विटाभट्टी परिसरातील नाल्यावर तारांचे जाळे दिसून आले. या तारांचा शोध घेतला असता ते जवळच्या ट्रान्सफार्मरपर्यंत गेल्याचे दिसून आले. डीपीचे कुलुप तुटलेले होते. खाली एक तार इतर तारांशी जुळलेला होता. तेथून इतर तारांना अंडरग्राऊंड पद्धतीने नाल्याच्यावरून झोपडपट्टीपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. लोकांच्या घरी अधिकृत कनेक्शन लावण्यात आले आहे. परंतु उपयोग मात्र चोरीचा विजेचाच केला जात आहे. यानंतर आमची चमू आॅटोमोटिव्ह चौकात पोहोचली. येथेसुद्धा थेट डीपीमधूनच वीजचोरी केली जात असल्याचे आढळून आले. या ठिकाणी जमिनीत खड्डा खोदून जवळच्या वस्तीतील तार आणून थेट डीपीच्या फेजलाच जोडण्यात आला आहे. वस्तीतील बहुतांश घरी विजेचे कनेक्शन आहे. परंतु बहुतांश वेळा चोरीच्या विजेचाच वापर केला जातो. सुगतनगर येथील म्हाडा कॉलनीमध्येसुद्धा उघडपणे वीजचोरी केली जात असल्याचे पाहता येते. या ठिकाणी सुद्धा थेट डीपीमधूनच वीज चोरी केली जात आहे.