मुंबई - अकरावी प्रवेशादरम्यान महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतयंदा बरेच बदल सुचविले आहेत. त्यात प्रवेश अद्ययावत करण्याची चावी महाविद्यालयांकडून काढून विद्यार्थ्यांना सोपवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या परवानगीशिवाय महाविद्यालयांना प्रवेश अद्ययावत करता येणार नसल्याचे शिक्षण विभागातील एका अधिका-याने सांगितले आहे.अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागत होता.यात महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय केवळ रिक्त जागा भरण्यासाठी प्रवेश निश्चिती दाखवण्यात येत होती. त्यामुळेविद्यार्थीप्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडत होते. त्यांना नाइलाजास्तव संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागत होता. तशा तक्रारीही शिक्षणउपसंचालक कार्यालयाकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत नवा बदल मंजूर झाल्याची माहिती शिक्षण विभागातील एका अधिका-याने‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. या माहितीनुसार, महाविद्यालयांनी प्रवेश अद्ययावत करण्यासाठी त्यास विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन परवानगी घेणे अपेक्षित असेल. त्याशिवाय महाविद्यालयाला प्रवेश अद्ययावत करता येणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन आयडीवरून गुणवत्ता यादीत मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास पसंती दर्शवावी लागेल. परिणामी, विद्यार्थ्यांची फसवणूक थांबेल.असा असेल बदलविद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर अकरावी महाविद्यालय प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना आॅनलाइन ‘प्रोसिड’ या नव्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर विद्यार्थ्याचा महाविद्यालयातील प्रवेश निश्चित होईल. त्यानुसार महाविद्यालयांना प्रवेश अद्ययावत करता येतील.
अकरावी प्रवेशाची चावी विद्यार्थ्यांच्या हाती, महाविद्यालयांआधी विद्यार्थ्यांची संमती आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 4:48 AM