शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

१६ आॅगस्टपासून अकरावीची दुसरी विशेष फेरी

By admin | Published: August 12, 2016 7:55 PM

अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले असून पहिल्या यादीत सामील झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 - अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले असून पहिल्या यादीत सामील झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे. नवे लॉगीन आयडी आणि पासवर्ड घेण्यासाठी १६ आॅगस्टला सुरूवात होणार असल्याचे उपसंचालक कार्यालयाने सांगितले. तरी पहिल्या विशेष फेरीत अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना नवीन लॉगीन आयडी आणि पासवर्ड घेण्याची गरज नसल्याचे शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी सांगितले.चव्हाण म्हणाले की, पहिल्या विशेष फेरीअखेर अर्ज केलेल्या ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांपैकी एकूण ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलाची संधी मिळाली आहे. मात्र या विशेष फेरीदरम्यान ७ हजार ६६७ विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांसह ज्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीतही आवडते महाविद्यालयमिळालेले नाही, त्यांना दुसऱ्या फेरीत संधी मिळणार आहे. मात्र नव्याने अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी तेथील रिक्त जागांची माहिती घेण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.याआधी पहिल्या विशेष फेरीत एकूण ३१ हजार ०४० विद्यार्थ्यांनी अर्धवट अर्ज भरले होते. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सामील होता आले नाही. तरी या विद्यार्थ्यांना दुसऱ्या विशेष फेरीत अर्ज करण्यासाठी नव्याने लॉगीन आयडी घेण्याची गरज नाही. जुन्याच लॉगीन आयडीवर अर्ज पूर्ण भरता येईल. मात्र प्रवेश अर्ज केल्यानंतर पसंतीक्रम अर्ज (आॅप्शन फॉर्म)भरताना विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण पहिल्या विशेष फेरीनंतर रिक्त जागांचा आकड्यात बदल झालेला असेल. त्यामुळे अर्धवट अर्ज पूर्ण करताना विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्जात योग्य बदल करण्याचीगरज आहे..........................दुसऱ्या फेरीतील अर्जांची संख्या वाढणारपहिल्या विशेष फेरीदरम्यान ३१ हजार ०४० विद्यार्थ्यांनी अर्धवट अर्ज भरले होते. तर गुणवत्ता यादीत ७ हजार ६६७ विद्यार्थ्यांना एकही महाविद्यालय मिळालेले नाही. तर महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांत केवळ ४० हजार ३२६ विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. याउलट उरलेल्या १९ हजार ६३४ विद्यार्थ्यांना चौथ्या आणि त्यानंतरच्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी दुसऱ्या विशेष फेरीत महाविद्यालय बदलासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दुसऱ्या विशेष फेरीसाठी सुमारे ५० हजारांहून अधिकअर्ज येण्याची शक्यता नाकारता येत नाही.............................दुसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक१६ ते १९ आॅगस्ट -मार्गदर्शन केंद्रावर नवीन लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करता येईल.(मार्गदर्शन केंद्रांचे पत्ते मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये दिलेले आहेत.)१९ व २० आॅगस्ट (रात्री ११.५८ वाजेपर्यंत)नवीन आॅनलाईन अर्ज आणि पसंतीक्रम अर्ज भरता येईल.२३ आॅगस्ट -दुसरी विशेष गुणवत्ता यादी सायंकाळी ५ वाजता जाहीर होईल.२४ आणि २५ आॅगस्ट -दुसऱ्या विशेष गुणवत्ता यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना सकाळी१० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान संबंधित महाविद्यालयात शुल्क भरून प्रवेशनिश्चित करता येईल...........................विद्यार्थ्यांनो हे लक्षात ठेवा...विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज भरताना संबंधित महाविद्यालयांतील रिक्तजागांची माहिती घेऊन पसंतीक्रम द्यावा.पहिल्यांदाच अर्ज करणाऱ्या आणि आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छीणाऱ्याविद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रावर जाऊन प्रवेश अर्ज भरावा लागेल.त्याशिवाय त्यांना पसंतीक्रम अर्ज भरता येणार नाही.पसंतीक्रम अर्जात किमान १० आणि कमाल १५ कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीदेणे बंधनकारक आहे.