पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपास अधिकाऱ्यांनी बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात अर्ज करत या प्रकरणाचे कागदपत्र पुरविण्यात यावे. तसेच यापुढे हा खटला मुंबई उच्च न्यायालयात असलेल्या एनआयएच्या विशेष न्यायालयात चालवण्यात यावा, अशी विनंती केली आहे. एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरणी येथील विशेष न्यायालयात सुरू असलेली सुनावणी यापुढे मुंबई येथील एनआयएच्या विशेष न्यायालयात होणार असल्याची शक्यता आहे. प्रकरणाचा तपास अधिक सविस्तरपणे करता यावा म्हणून एनआयएने त्यांच्या प्रक्रियेनुसार नवीन एफआयआर देखील दाखल केली आहे. या सर्वांवर येथील विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी सरकारी वकील आणि बचाव पक्षाचा आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. तीन फेब्रुवारी रोजी यावर सुनावणी होणार असून त्याच दिवशी निकाल होण्याची शक्यता आहे. एनआयए तपास करीत असलेल्या प्रकरणाचा खटला चालवण्याचे अधिकार पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील एका न्यायालयाकडे आहे. मात्र असे असताना एनआयएने हे प्रकरण मुंबईत चालवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या पुढील सुनावणी मुंबईत होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरणाची सुनावणी मुंबईत होणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 2:04 PM
यापुढे हा खटला मुंबई उच्च न्यायालयात असलेल्या एनआयएच्या विशेष न्यायालयात चालवण्यात यावा....
ठळक मुद्देएनआयएने त्यांच्या प्रक्रियेनुसार नवीन एफआयआर देखील केली दाखल