शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
2
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
3
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
4
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
6
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
7
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
8
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
9
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
10
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
11
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
12
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
13
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
14
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
15
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
16
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
17
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
18
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
19
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
20
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

आपत्कालीन रुग्णवाहिका जीवनदायिनी!

By admin | Published: March 05, 2017 1:51 AM

अपघात, भूकंप, वैद्यकीय आपत्कालीन स्थिती अशा परिस्थितीत रुग्णांवर पहिल्या १0 ते १५ मिनिटांच्या कालावधीत (गोल्डन अवर) वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी आपत्कालीन

- अजय जाधवअपघात, भूकंप, वैद्यकीय आपत्कालीन स्थिती अशा परिस्थितीत रुग्णांवर पहिल्या १0 ते १५ मिनिटांच्या कालावधीत (गोल्डन अवर) वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. या सेवेसाठी देण्यात आलेला १0८ हा क्रमांक सामान्यांसाठी जीवरक्षकाची भूमिका बजावित आहे. अपघात, आगीच्या दुर्घटना, हृदयविकार, प्रसूतीकालीन आपत्कालीन मदत अशा विविध घटनांमध्ये सामान्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी १0८ सेवेचा वापर वाढला आहे.महामार्गावर होणाऱ्या अपघातांत दरवर्षी हजारो जण आपला जीव गमावतात. अशा परिस्थितीत अपघात झाल्यानंतर जखमींवर काही मिनिटांतच जर प्राथमिक वैद्यकीय उपचार आणि जवळच्या रु ग्णालयात दाखल करण्याची सोय झाली तर जखमींचे प्राण वाचू शकतात. याच उद्देशाने ही आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली. या सेवेमुळे फक्त रस्ते अपघातांतीलच नव्हे, तर अन्य नैसर्गिक आपत्ती आणि वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील रुग्णांना १०८ क्रमांक सेवेच्या रुग्णवाहिकांमुळे नवजीवन मिळाले आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन वर्षांत झालेल्या अपघातांमधील जवळपास १ लाख ५६ हजार जखमींना आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या रुग्णवाहिकांमार्फत प्रथमोपचार व त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. २0१६मध्ये नाशिक (५६९0), अहमदनगर (४९0५) व पुणे (४५0९) या तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अपघातांतील जखमींना या सेवेचा लाभ मिळाला आहे. जखमींना तातडीने उपचार व रुग्णालयात भरती करण्याचे महत्त्वपूर्ण काम करण्यात आले आहे.(लेखक हे आरोग्य विभागाचे विभागीय संपर्कअधिकारी आहेत.)असे चालते रुग्णवाहिकेचे कार्य!पुणेजवळील औंध येथील रुग्णालयात इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर सुरू करण्यात आले आहे. १0८ हा क्रमांक राज्यभरातून कुठूनही डायल झाल्यावर तो कॉल या सेंटरमध्ये येतो. या ठिकाणच्या यंत्रणेवर डायल करणाऱ्या व्यक्तीचा नंबर येतो. त्याचे नाव नोंदविले जाते. कॉलरकडून माहिती विचारली जाते. गाव, जिल्हा, तालुका किंवा ओळखीच्या ठिकाणाची माहिती नोंदवली जाते. ही माहिती जसजशी नोंदवली जाते तसतशा ज्या ठिकाणाहून कॉल आला तेथील उपलब्ध रुग्णवाहिका मॅपवर दिसू लागतात. जेथून कॉल आला आहे त्या ठिकाणाहून कुठली रुग्णवाहिका जवळ आहे याची माहिती या केंद्रातील यंत्रणेवर तत्काळ दिसते. त्यानंतर रुग्णवाहिकेतील डॉक्टर आणि कॉलर यांचे एकमेकांशी बोलणेदेखील या केंद्रावरून केले जाते. कॉलरला डॉक्टर व चालकाचा क्रमांकदेखील एसएमएस केला जातो. त्यानंतर रुग्णवाहिका इच्छीतस्थळी पोहोचते. मोबाइल अ‍ॅपया सेवेसाठी मोबाइल अ‍ॅपदेखील तयार करण्यात आले असून, त्या माध्यमातूनदेखील रुग्णवाहिकेसाठी मदत मागितली जाऊ शकते. या अ‍ॅपमध्ये कॉलसोबत टेक्स्ट मेसेज करण्याचीदेखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अ‍ॅपच्या वापरकर्त्याने त्याच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र यांचा संपर्क तपशील नोंदविला असेल आणि आपत्कालीन परिस्थितीत वापरकर्त्याने वैद्यकीय मदतीसाठी रुग्णवाहिकेला कॉल केला तर त्याचवेळी संपर्क तपशील नोंदविलेल्या व्यक्तींना एसएमएस पाठविला जातो.मातामृत्यूचे प्रमाण घटलेविशेष बाब म्हणजे आपत्कालीन परिस्थितीतून उद्भवणाऱ्या परिस्थितीतील वैद्यकीय साहाय्यतेबरोबरच १0८ हा क्रमांक सामान्य जनतेला माहीत झाल्याने गरोदरपणात उद्भवणाऱ्या आपत्कालीन स्थितीसाठीदेखील १0८ क्रमांक डायल केला जातो. तीन वर्षांत ३ लाख ९४ हजार ४६१ केसेस हाताळण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे १२ हजार ३७८ केसेसमध्ये रुग्णवाहिकेमध्येच सुरक्षित बाळंतपण झाल्याची नोंद झाली आहे. यातील ६0६६ केसेस या २0१६मधील आहेत. रुग्णवाहिकेच्या मदतीने गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करणे आणि रुग्णवाहिकेतच सुरक्षित बाळंतपण होणे याचे प्रमाण हे जवळपास सर्वाधिक म्हणजे ३१ टक्के आहे. महाराष्ट्रातील मातामृत्यूचे प्रमाण देशात कमी असल्याचे केंद्र शासनाच्या अहवालात म्हटले असून, संस्थात्मक बाळंतपणामुळे हे प्रमाण कमी झाल्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले.ग्रामीण भागात वीज पडून होणाऱ्या दुर्घटनेतील जखमींनादेखील वेळेवर रुग्णालयात पोहोचविण्याची जबाबदारी या आपत्कालीन रुग्णवाहिकांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. तीन वर्षांत अशा प्रकारच्या २४00 रुग्णांना वेळेवर सेवा मिळाली आहे. शाळांमध्ये जाणीवजागृती अभियानशालेय विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदतीबाबत जाणीवजागृती करण्यासाठी प्रशिक्षणदेखील आपत्कालीन सेवा चमूच्या माध्यमातून शाळांमध्ये दिले जाते. राज्यातील ५७१९ शाळांमधील सुमारे ७ लाख ७0 हजार ६0६ विद्यार्थ्यांना अशा प्रकारे प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्याचबरोबर ६४३0 गावांमध्येही जाणीवजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यानही सुमारे लाखभर रुग्णांनी १0८ क्रमांकाच्या सेवेचा लाभ घेतला आहे. आषाढी एकादशी वारी, गणेशोत्सव, माळीण येथील दुर्घटनेमध्येही या सेवेचा चांगला उपयोग झाला असून, त्यामुळे अनेकांना जीवनदान मिळाले आहे.१२ हजार ५00 मातांना सुरक्षित मातृत्वआरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या (क्र मांक १0८) रुग्णवाहिकेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत १४ लाखांपेक्षा अधिक जणांना जीवनदान देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. रुग्णांचे प्राण वाचविण्यासोबतच या रु ग्णवाहिकेत १२ हजार ४२८ बालकांना नवजीवन देण्यात आले. त्यामुळे ही रुग्णवाहिका सेवा सामान्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘जीवनदायिनी’ ठरली आहे. राज्यात ९३७ रुग्णवाहिकांच्या मदतीने ही सेवा अहोरात्र अविरत सुरू आहे.