नवी मुंबई : ढोल ताशांचा गजर व गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आज दीड दिवसाच्या गणरायास भक्तिभावाने निरोप देण्यात आला. विसजर्न तलावांवर भाविकांनी मोठय़ाप्रमाणात गर्दी केली होती. रात्री उशिरार्पयत बाप्पाला निरोप देण्यात येत होता.
नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये 56 हजारपेक्षा जास्त घरगुती गणरायांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मुंबईतील धावपळीच्या जीवनामध्ये सर्वाना अनंतचतुर्दशीर्पयत गणरायाची सेवा करता येत नाही. यामुळे दीड दिवसाचे पूजन करून बाप्पाला निरोप दिला जातो. शनिवारी नवी मुंबईतील 23 विसजर्न तलावांवर बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
घरगुती गणरायाला निरोप देण्यासाठीही अनेक ठिकाणी ढोल- ताशांचे तथक बोलावण्यात आले होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर सर्वत्र ऐकू येत होता. रात्री उशिरार्पयत तलावांवर भाविक उपस्थित होते. महापालिका प्रशासनाने तलावांवर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक
नियुक्त केले आहेत. तराफा,
बांबूंचे बॅरीकेड, विद्युत
व्यवस्था, भाविकांना पिण्यासाठी पाणी, वैद्यकीय पथकही तैनात
केले होते.
पोलिस प्रशासनाच्या वतीनेही विसजर्न तलाव व परिसरामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक ठिकाणी सीसी टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात आले होते. भाविकांनी विशेषत: महिलांनी दागिने, लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत होते. खारघर, कळंबोली, पनवेल, उरण परिसरामध्येही गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.