शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

गोशाळेत ढवळीने घेतला अखेरचा श्वास! खड्ड्यात पडून गाय झाली होती जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 9:42 AM

‘लोकमत’च्या बातमीची दखल घेऊन डॉ. सचिन म्हापणकर आणि डॉ. दळवी हे ८० किमी अंतरावरून दुसऱ्या दिवशी तेलमच्या घरी पोहोचले. त्यांनी ढवळीवर उपचार सुरू केले. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आणि ढवळीने सुंदर अशा एका गाईला जन्म दिला. तिचे नाव ‘गोकुळी’ असे ठेवण्यात आले.

- विशाल हळदेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वासराला जन्म दिल्यानंतर साधारणत: आठ दिवसांनी शहापूर तालुक्यातील विहिगावच्या ढवळी गायीने सोमवारी भिवंडीजवळच्या गोशाळेत अखेरचा श्वास घेतला. १५ दिवसांपूर्वी ती गाभण असताना गावाजवळ चरायला गेली असता, खड्ड्यात पडून जखमी झाली होती.

कसारा घाटातून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्यावर विहिगाव आहे.  या विहिगावातील ढवळी गाय गाभण असताना चरायला गेली असता टेकडीवरून आठ फूट खोल खड्ड्यात पडली. त्यामुळे तिच्या कमरेचे हाड मोडले. तुकाराम तेलम यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच गायीवर अवलंबून होता. ढवळी जखमी झाल्याचे समजताच, तेलम कुटुंबीयांनी बैलगाडीत ठेवून स्वत: बैलगाडी ओढत घरी आणली. ‘लोकमत’मध्ये ही बातमी प्रकाशित होताच समाजमन ढवळून निघाले.

‘लोकमत’च्या बातमीची दखल घेऊन डॉ. सचिन म्हापणकर आणि डॉ. दळवी हे ८० किमी अंतरावरून दुसऱ्या दिवशी तेलमच्या घरी पोहोचले. त्यांनी ढवळीवर उपचार सुरू केले. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आणि ढवळीने सुंदर अशा एका गाईला जन्म दिला. तिचे नाव ‘गोकुळी’ असे ठेवण्यात आले.

ढवळीच्या कमरेचे माकडहाड मोडल्यामुळे जवळजवळ दहा दिवस ती जागेवरच बसून होती. त्यातून गाईला एकाबाजूला लकवा होईल, अशी भीती डॉ. म्हापणकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे पुढील उपचारासाठी ढवळीला भिवंडी तालुक्यातील अनगाव येथील गोपाळ गोशाळेत हलविण्यात आले.  या गोशाळेत ढवळीवर उपचार करण्यात आले. पहिले तीन, चार दिवस व्यवस्थित गेले. परंतु अचानक ढवळीने चारा खाणे बंद केले. तिच्या कमरेत मोठ्या प्रमाणात पाणी झाल्याने तिला असह्य वेदना होत होत्या. त्यातच ‘गोकुळी’शी ताटातूट झाल्याने ती खचली होती. अशातच तिने सोमवारी सकाळी शेवटचा श्वास घेतला.

गोशाळेतच अंत्यसंस्कारगोशाळेने ढवळीचे अंत्यसंस्कार गोशाळेतच केले. गोशाळेचे काही नियम असतात आणि त्या नियमांचे पालन करूनच ढवळीला अखेरचा निरोप देण्यात आला, असे डॉ. सचिन म्हापणकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

ढवळी गेली, पण छबी सोडून गेली‘लोकमत’ला आलेली बातमी वाचूनच आम्ही विहिगावला पोहोचलो. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केले. त्यामुळेच ढवळीने जन्म दिलेल्या वासराला, गोकुळीला आम्ही वाचवू शकलो. ढवळीच्या कमरेला जबर घाव झाला होता. गोशाळेत उपचार सुरू असतानाही, मी तेथील कर्मचाऱ्यांच्या नियमित संपर्कात होतो. ढवळीची जिद्द होती म्हणून तिने वासराला जन्म दिला. त्यासाठी तिने किती वेदना सहन केल्या, हे तिलाच माहिती. अखेर ढवळी गेली, पण तिची छबी सोडून गेली.- डाॅ. सचिन म्हापणकर

ढवळी आमच्या कुटुंबातील सदस्य होती. ती गेली. आता यापुढे आम्ही कुणापुढेच हात पसरणार नाही. तिच्या वेदना बघवत नव्हत्या. गोकुळी हे तिचेच रूप आहे. आता तिची देखभाल आम्ही व्यवस्थित करू.- तुकाराम तेलम, ग्रामस्थ

टॅग्स :cowगाय