मुंबई/नवी दिल्ली :
यंदा मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याचा अंदाज खासगी हवामान संस्था स्कायमेटने सोमवारी व्यक्त केला. महाराष्ट्रात जुलै व ऑगस्टमध्ये अपुऱ्या पावसाचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला. देशभरात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पाऊस दडी मारण्याची शक्यता असून जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ९४ टक्के (पाच टक्के कमी/जास्त) म्हणजे ८१६.५ मिमी पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
‘अल निनो’ सगळे चक्र फिरवणार’‘ला निना’मध्ये समुद्राचे पाणी झपाट्याने थंड होते. त्यामुळे पाऊस सामान्यपेक्षा जास्त पडतो. भारतात कमी-अधिक प्रमाणात पाऊस, थंडी आणि उष्णता केवळ ‘ला निना’वर अवलंबून असते. अल निनोमध्ये समुद्राचे तापमान ३ ते ४ अंशांनी वाढते.
भरपाईसाठी आज विशेष बैठकनाशिक : गारपीट, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना लवकरच भरीव मदत दिली जाईल. त्यासाठी मंगळवारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्यात येणार असून तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. अमरावती : राज्यात पहिल्यांदा सततच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीची व्याख्या बदलली व हे नुकसान आता आपत्तीमध्ये समाविष्ट करण्यात आले. नुकसानीसाठी तातडीने पंचनामे करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
कधी किती पाऊस?- जून - सरासरीच्या ९९% (शक्यता८०%)- जुलै - सरासरीच्या ९५% (शक्यता७०%)- ऑगस्ट - सरासरीच्या ९२% (शक्यता४०%)- सप्टेंबर - सरासरीच्या ९०% (शक्यता३०%)असा अंदाज ‘स्कायमेट’ने व्यक्त केला आहे.
मार्चमधील अवकाळी, गारपिटीसाठी १७७ कोटी मुंबई : राज्यात मार्च महिन्यात झालेल्या नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारने १७७ कोटींची तातडीची मदत जाहीर केली. अमरावती विभाग : २४ कोटी ५७ लाख ९५ हजार नाशिक विभाग : ६३ कोटी ९ लाख ७७ हजारपुणे विभाग : ५ कोटी ३७ लाख ७० हजार छ. संभाजीनगर : ८४ कोटी ७५ लाख १९ हजारएकूण निधी : १७७ कोटी ८० लाख ६१ हजार.