"महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, भाजपा सरकारने कमिशन घेऊन चुकीच्या मार्गाने ठेके दिले’’ पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 08:47 PM2024-08-03T20:47:42+5:302024-08-03T20:48:49+5:30

Prithviraj Chavan Criticize BJP Government: कोल्हापूर ते पुणे महामार्गावर पडलेले खड्डे आणि वाहनांकडून वारेमाप प्रमाणात आकारण्यात येत असलेल्या टोलविरोधात काँग्रेसने आज ठिकठिकाणी व्यापक आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि सरकारवर गंभीर आरोप केले.

"Empire of potholes on the highway, BJP government awarded contracts in wrong way by taking commission" Serious accusation of Prithviraj Chavan  | "महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, भाजपा सरकारने कमिशन घेऊन चुकीच्या मार्गाने ठेके दिले’’ पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप 

"महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, भाजपा सरकारने कमिशन घेऊन चुकीच्या मार्गाने ठेके दिले’’ पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप 

मुंबई - कोल्हापूर ते पुणे महामार्गावर पडलेले खड्डे आणि वाहनांकडून वारेमाप प्रमाणात आकारण्यात येत असलेल्या टोलविरोधात काँग्रेसने आज ठिकठिकाणी व्यापक आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि सरकारवर गंभीर आरोप केले. भाजपा सरकारने कमिशन घेऊन चुकीच्या मार्गाने ठेके दिले, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आनेवाडी तासवडे या सातारा जिल्ह्यातील दोन टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, खड्डेयुक्त महामार्ग असताना केंद्र सरकारने दोन दोन ठेकेदारांना ठेका दिलेला आहे. हा जनतेचा पैसा आहे. मोदी गडकरींच्या खिशातील पैसा आहे का? असा संतप्त सवाल केला. अदानी आणि रिलायन्सला महामार्गाच्या कामाचा काय अनुभव आहे म्हणून त्यांना ठेका दिला आहे. गेल्या वर्षांपासून प्रवाशांची परवड सुरू असून,  महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. १५-२० टक्के कमिशन घेण्यासाठी चुकीच्या मार्गाने ठेका देण्याची प्रथा मोदींनी सुरू केली आहे. महामार्गाचे उप ठेका डी.पी. जैन यांना दिला असून,  गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे हजार कामगारांचे पगार झालेले नाहीत. यामुळेच कामाला गती मिळत नसून याचा नाहक त्रास जनतेला भोगावा लागत आहे. 

तर पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाक्यावर आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुणे सातारा महामार्गाची दुरवस्था झाल्याने संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले आहेत तरिही टोल वसुली केली जात आहे. ८ दिवसाच्या आता खड्डे बुजवण्याची मागणी यावेळी करण्यात महामार्ग प्राधिकरणाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. 

दरम्यान, कोल्हापूर ते पुणे महामार्गावर प्रचंड खड्डे पडले असून रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत टोल माफी करण्यात यावी, ही मागणी घेऊन काँग्रेस पक्षाच्यावतीने आज टोल नाक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. कोल्हापूरहून पुणे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील किणी, तासवडे, आनेवाडी आणि खेड शिवापुर या चारही टोल नाक्याच्या ठिकाणी काँग्रेसने एकाचवेळी आंदोलन केले. टोलमाफी वरून काँग्रेसने पुकारलेल्या या आंदोलनाला अखेर यश आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते कोल्हापूर दरम्यानचा रस्ता जोपर्यंत सुस्थितीत होत नाही तोपर्यंत २५% टोल सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय २० किलोमीटर परिसरातील गावातील वाहनधारकांना टोल माफी असणार आहे. तर ५० टक्के टोल सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव येत्या एक महिन्याच्या आत केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. याबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर काँग्रेसने आंदोलन स्थगित केले आहे. 

Web Title: "Empire of potholes on the highway, BJP government awarded contracts in wrong way by taking commission" Serious accusation of Prithviraj Chavan 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.