शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

अधिकारी व कर्मचाऱ्यांची बढती रखडली

By admin | Published: October 14, 2015 3:48 AM

एसटी महामंडळात गेल्या तीन वर्षांपासून विभागीय बढती समितीची बैठकच पार पडलेली नाही. त्यामुळे राज्यातील १८0 कर्मचारी, अधिकाऱ्यांची बढती रखडल्याचे समोर आले असून त्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुंबई : एसटी महामंडळात गेल्या तीन वर्षांपासून विभागीय बढती समितीची बैठकच पार पडलेली नाही. त्यामुळे राज्यातील १८0 कर्मचारी, अधिकाऱ्यांची बढती रखडल्याचे समोर आले असून त्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. या समितीची बैठक होणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे. एसटी महामंडळात विभागीय बढती समिती असून, कर्मचारी, अधिकाऱ्यांची बढती या समितीमार्फत होते. या समितीवर एसटीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, परिवहन आयुक्त, कामगार आयुक्त, शासनाचा प्रतिनिधी म्हणून एक मागासवर्गीय अधिकारी आणि एसटीच्या महामंडळाचा एक सदस्य असतो. जीवनराव गोरे हे एसटीचे अध्यक्ष असताना त्यांच्या काळात आॅक्टोबर २0१२मध्ये समितीची बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मे २0१३मध्ये बढतीचा निकाल लावण्यात आला आणि अनेकांची बढती झाली. त्यानंतर एसटीत अनेक कर्मचारी, अधिकारी निवृत्त होत गेले. परंतु या निवृत्तीनंतर झालेल्या रिकाम्या जागा एसटीकडून भरल्याच गेल्या नाहीत. तेव्हापासून १८0 जणांची बढती रखडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यामध्ये विभागीय नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, मॅकेनिकल इंजिनीअर, सुरक्षा अधिकारी, अकाउंट अधिकारी, कर्मचारी वर्ग व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाव्यवस्थापकसारख्या पदांवरही काही जणांना तात्पुरती बढती दिली आहे. यामुळे एसटीचा कारभार ढिसाळ होण्यास हे एक महत्त्वाचे कारण ठरत असल्याचे सांगण्यात आले. सध्या एसटी महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापक या पदाचा तात्पुरता कारभार हा व्ही. रत्नपारखी यांच्याकडे दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते हा कारभार बघत असून, त्यांच्याकडे उपमहाव्यवस्थापक पदाचा कारभार आहे. महाव्यवस्थापक कर्मचारी वर्गाचा तात्पुरता कार्यभार हा डी.आर. पंचवाघ यांच्याकडे आहे. त्यांचे सध्याचे पद हे उपमहाव्यवस्थापक असे आहे.