शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

प्राप्तिकर विभागाच्या दोन निरीक्षकांना सक्तमजुरी

By admin | Published: December 30, 2016 7:58 PM

सीबीआयचे विशेष न्यायाधीश डी. एम. देशमुख यांनी ३ वर्षांची सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 30 - तब्बल साडेआठ लाख रुपयांचा दंड माफ करून देण्यासाठी दोन लाखांची लाच मागत त्यातील ५० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या दोन निरीक्षकांना सीबीआयचे विशेष न्यायाधीश डी. एम. देशमुख यांनी ३ वर्षांची सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हे दोन्हीही निरीक्षक प्राप्तिकर विभागाचे अधिकारी होते. सचिन प्रवीणकुमार (वय २८), सुनीलकुमार इंद्रराज शर्मा (वय ४३) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सुधाकर पवार यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार व्यावसायिक आहेत. त्यांना आर्थिक व्यवहारांमधील अनियमिततेबाबत साडेआठ लाख रुपयांचा दंड प्राप्तिकर विभागाने केला होता. हा दंड माफ करण्यासाठी प्रविणकुमार व शर्मा यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत त्यांनी सीबीआयकडे रितसर तक्रार दाखल केली. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुचनांनुसार त्यांनी दोघांना दूरध्वनी केला. लाचेचा पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये घेण्यासाठी आलेले हे दोघे २१ सप्टेंबर २०१५ रोजी रंगेहात सापडले. सीबीआयच्या अधिकारी शीतल शेंडगे या सापळा अधिकारी होत्या. कारवाई झाल्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांनाही दोषी ठरवत शिक्षा आणि दंड सुनावला. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. मनोज चलाडन यांनी काम पाहिले. तर पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले.