शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

विम्याचे पैसे वाढवल्याने मालक त्रस्त

By admin | Published: April 08, 2017 3:02 AM

नवीन शैक्षणिक वर्षात स्कूलबसच्या शुल्कात वाढ करण्यात येणार असल्याने अनेक पालकांच्या कपाळाला आठ्या पडल्या आहेत.

मुंबई : नवीन शैक्षणिक वर्षात स्कूलबसच्या शुल्कात वाढ करण्यात येणार असल्याने अनेक पालकांच्या कपाळाला आठ्या पडल्या आहेत. पण, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विम्याची रक्कम वाढवल्याने याचा फटका बस मालकांना बसणार आहे. त्यामुळे मालकांना बसणाऱ्या फटक्याविरुद्ध संपाचे हत्यार उगारण्याचा इशारा देण्यात आला आहे. विमा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर वाढवला असून, हफ्त्यामध्येही वाढ केली आहे. यामुळे मोटार मालकांना याचा चांगलाच फटका बसणार आहे. मालकांना अन्य गोष्टींचा आर्थिक भार सहन करावा लागतो. त्यातच आता हफ्त्याचा भार पडणार आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी कर आणि हफ्ता कमी करावा, अशी मागणी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्टने मागणी केली आहे. पण, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे शनिवारी पुण्यात एका बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत चर्चा करून चक्का जाम आंदोलन करायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे स्कूलबस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले. पुण्यात होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्र ट्रक, टँकर, बस वाहतूक महासंघाचे पदाधिकारी एकत्र येणार आहेत. या वेळी स्कूलबसचे मालकही यात सहभागी होणार आहेत. त्यांनी संपाचा निर्णय घेतल्यास स्कूलबस मालकही संपात सहभागी होणार आहेत. स्कूलबस चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतल्यास विद्यार्थी आणि पालकांचे हाल होऊ शकतात. अजूनही अनेक शाळांच्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यास गैरसोय होऊ शकते. महागाई वाढल्याने बसचालकांच्या खर्चात कितीतरी टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य सेवासुविधा देण्यासाठी बदल केले आहेत. त्यात आता विम्याचा खर्च वाढला असल्याचे गर्ग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)