नागपूर : लोकसभेतील पराभव अनपेक्षित अन् धक्कादायक होता. मोदींनी देशाला खोटी स्वप्ने दाखविली. भुरळ टाकली़ जनता फसली. आता लोकांना वास्तवाची जाणीव होऊ लागली आहे. कुठे आहेत अच्छे दिन, असे लोक विचारू लागले आहेत. मोदींच्या जादूला ओहोटी लागली आह़े नुकतेच झालेले सव्रेही तसेच सांगताहेत, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकत्र्यामध्ये निर्माण केला. विदर्भाशी दुजाभाव केला जाणार नाही, अशी ग्वाही देत ताकदीने पक्षाच्या कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी कार्यकत्र्याना केले.
काँग्रेसचा विदर्भ विभागीय मेळावा वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. या वेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस माजी खा. मुकुल वासनिक, विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके, पालकमंत्री नितीन राऊत, माजी खा. विलास मुत्तेमवार, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, राज्यमंत्री राजेंद्र मुळक आदी उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी विदर्भ विकासासाठी घेतलेल्या विविध निर्णयांचा पाढा वाचला. झुडपी जंगल, नझुल जमीन पट्टे हस्तांतरण, वस्त्रोद्योग धोरण आदी बाबतींत निर्णय घेतले. औद्योगिक धोरणात विदर्भाला झुकते माप दिले. नागपुरात मेट्रो रेल्वेच्या भूमिपूजनाची तयारी झाली आहे. केंद्र सरकारने जेव्हीसीला मंजुरी दिली तर पुढील आठवडय़ात भूमिपूजन करता येईल. गोसेखुर्द पुनर्वसनासाठी 12क्क् कोटी दिले. याशिवाय गारपीटग्रस्तांसाठी 4 हजार कोटी रुपये देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीला एकही वाढीव जागा नाही
जागावाटपाबाबत मुख्यमंत्री व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. राष्ट्रवादीने 144 जागांची मागणी केली. मात्र, जुन्याच जागा मिळतील एकही जागा वाढवून मिळणार नाही, विदर्भातील एकही मतदारसंघ सोडणार नाही, असे राष्ट्रवादीला स्पष्ट केल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादीचा पवित्र बरोबर दिसत नाही. वेळेवर घात होऊ नये म्हणूनच आपण 288 जागांवर तयारीला लागण्याच्या सूचना देऊन इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. 16 ते 17 ऑगस्टर्पयत उमेदवार निश्चित करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.