दांडगुरी : संपूर्ण रायगड जिल्ह्यात गेले तीन दिवस सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे समुद्राला उधाण आले असून श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर या गावात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उधाणाचे पाणी अंदाजे दोनशे फुटापर्यंत गावात आले असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सरकारने धूप प्रतिबंध बंधारा बांधण्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर केला असून त्यातील अडीच कोटींचा पहिला निधी देण्याची घोषणा देखील जाहीर झाली परंतु सीआरझेडचा विषय प्रलंबित राहिल्याने घोषणा आणि निधी जैसे थे ही स्थिती पहावयास मिळत आहे तर दिवेआगर गाव भलेमोठे असले तरी मात्र ज्या बाजूने समुद्राच्या उधाणाचे पाणी गावात शिरणार आहे तो दिवेआगर मधील गावठाण अंदाजे १९६८ साली शासनाने गाव विस्ताराच्या दृष्टिकोनातून हे गावठाण या ठिकाणी घोषित करून येथील स्थानिक असून बेघर असलेल्यांना या जागेवर विस्तार करण्यासाठी हे प्लॉट बेघर असलेल्या भूमिपुत्रांना या गावठाणामध्ये घर बांधण्यासाठी देण्यात आले परंतु आता या ठिकाणी समुद्राचे पाणी गावात घुसण्याची दाट शक्यता असून येथील नागरिक भयभीत झाले आहेत. शासनाने वेळीच दखल घेऊन धूपप्रतिबंधक बंधारा वेळीच बांधला असता तर ग्रामस्थांच्या मनात आलेली भीती निर्माण झाली नसती. रायगडमध्ये होत असलेल्या पुराची दखल घेत शासनाने वेळीच या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा बांधून भयभीत असलेल्या ग्रामस्थांची मनात असलेल्या भीती दूर करून शासनाने या दिवेआगर गावाकडे प्रामुख्याने लक्ष देऊन ग्रामस्थांना मदतीचा हात देण्याची मागणी जोर धरत आहे.>धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने समुद्राच्या उधाणाचे पाणी दिवेआगर गावात घुसण्याची दाट शक्यता,अंदाजे दोनशे फूट समुद्राचे पाणी बाहेर आल्याने केतकीची झाडे सुध्दा कोलमडून पडली आहेत.
उधाणाचे पाणी दिवेआगरात घुसण्याची भीती
By admin | Published: August 04, 2016 2:23 AM