शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
5
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
6
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
7
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
8
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
9
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
10
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
11
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
12
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
15
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
16
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
17
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
18
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
19
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
20
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  

नवसाहित्यिकांना प्रोत्साहन द्यावे!

By admin | Published: March 14, 2016 1:52 AM

राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचे वाजले सूप; समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांचे अवाहन.

बुलडाणा : साहित्यसृष्टी सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी व नवसाहित्यिक घडविण्यासाठी अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाची नितांत आवश्यकता आहे. महाराष्ट्रात कितीही नैसर्गिकदृष्ट्या दुष्काळाची स्थिती असली तरी साहित्याच्या क्षेत्रात मात्र प्रचंड सुकाळ आहे. या प्रतिभेला प्रोत्साहन देऊन ती फुलविण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगानेच दुर्लक्षित आणि गौरवान्वित प्रतिभांचा पहिल्या राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनात संगम घडून आल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. बलडाण्यातील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात स्थापन करण्यात आलेल्या संत चोखामेळा साहित्य परिसरात १२ मार्चपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी मत व्यक्त केले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. एस. एम. कानडजे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संमेलनाचे अध्यक्ष दा.सु. वैद्य, सुप्रसिद्ध कवी प्रसाद कुळकर्णी, विदर्भाचे साने गुरुजी म्हणून लौकिक असलेले बालसाहित्यिक शंकर कराडे, ज्येष्ठ साहित्यिक गो. या. सावजी, संमेलनाच्या स्वागताध्यक्ष अरुणा कुल्ली, संयोजक नरेंद्र लांजेवार उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमात बोलताना दा.सु. वैद्य म्हणाले, की बुलडाणा येथे पार पडलेल्या बालकुमार युवासाहित्य संमेलनात अनेक प्रकारच्या प्रतिभांचा संगम दिसून आला. हा साहित्यिक प्रतिभेचा एक आविष्कार आहे. खरं म्हणजे साहित्यात रंजन, भंजन आणि निरंजन होणे आवश्यक आहे. नवलेखकांची प्रतिभा यासारख्या साहित्य संमेलनातून आणखी समृद्ध होईल आणि त्यातूनच साहित्य क्षेत्रात सृजनाचा उत्सव खर्‍या अर्थाने प्रारंभ होईल, असे सांगून ह्यऐल राहू पैल जाऊ, पात्र सारे कोरडे.. शब्द देऊ शब्द घेऊ, अर्थ सारे सापडेह्ण या काव्यातून त्यांनी या साहित्य संमेलनातून यापुढे होणार्‍या प्रतिभेचा निरंतर प्रवास सुरू होईल, असे सांगितले. याप्रसंगी बोलताना प्रा.डॉ.एस.एम. कानडजे म्हणाले, की या साहित्य संमेलनामध्ये साहित्याच्या घुसळणीतून नवलेखकांच्या प्रतिभेला नवे धुमारे फुटतील व त्यातून अत्यंत दर्जेदार साहित्यनिर्मिती होईल. पहिल्या राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचा प्रारंभ (ओनामा) साहित्याची समृद्ध परंपरा असलेल्या बुलडाणा नगरीत झाल्याचा उल्लेख पुढील काळात सातत्याने होत राहील, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन संमेलनाचे संयोजक नरेंद्र लांजेवार यांनी केले. पंजाबराव गायकवाड यांनी आभार मानले. संमेलनाला सहकार्य करणार्‍यांचा तसेच पत्रकारांचा यावेळी स्मृतिचिन्ह, पुस्तक, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. संमेलनात पाच ठराव पारितया संमेलनात एकूण पाच ठराव घेण्यात आले. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याला माँ जिजाऊंच्या नावे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, देशातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी बालकांच्या सांस्कृतिक व साहित्यिक विकासासाठी बालभवन निर्माण केले जावे. राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाकडून साहित्य प्रकाशित करण्यासाठी देण्यात येणार्‍या अनुदानामध्ये वयाची अट शिथिल करण्यात यावी, जेणेकरून १८ वर्षाखालील बालसाहित्यिकांनाही त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यास मदत होईल, विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता या भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ केले जावे, शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवारातील मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, असे ठराव पारित करण्यात आले.