मुंबई: अतिक्रमणाच्या विळख्यात रखडलेला ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचा अखेर दोन दशकांनंतर कृती आराखडा तयार झाला आहे़ त्यानुसार नदी नाल्यांच्या रुंदीकरणात अडथळा ठरलेले २७ हजार २१३ अतिक्रमणे पावसाळ्यानंतर हटविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने आज घेतला़ त्यामुळे लवकरच नदी नाल्यांचा श्वास मोकळा होणार आहे़१९९३ मध्ये ब्रिमस्टोवॅड प्रकल्प तयार झाला़ मात्र २००५ मध्ये मुंबईत आलेल्या पुरानंतर ब्रिमस्टोवॅडची वीट रचली गेली़ या अंतर्गत गटार झालेल्या नदी आणि नाल्यांचे रुंदीकरण, पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविणे आदी कामे हाती घेण्यात आली़ मात्र नदी नाल्यांमध्ये मधल्या काही काळात बेकायदा झोपड्या उभ्या राहिल्या़ या अतिक्रमणाचा मोठा फटका नाले रुंदीकरण प्रकल्पाला बसला़दरवर्षी पावसाळ्यात सखल भाग पाण्याखाली जात असून पालिकेला टीकेचे धनी व्हावे लागत आहे़ त्यामुळे या प्रकल्पाला गती देण्यासाठी आयुक्त अजय मेहता यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली़ अतिक्रमणे दूर करण्याचा कृती आराखडा या बैठकीत अधिकाऱ्यांनी सादर केला़ त्यानुसार १ आॅक्टोबरपासून नदी नाल्यांमधील बेकायदा बांधकाम पाडण्याची कार्यवाही सुरु होणार आहे़ (प्रतिनिधी)>अशी आहेत अतिक्रमणेप्रथम प्राधान्य देण्यात आलेले ६१़३१ कि़मी़ नाल्यांमध्ये १९़७० कि़मी़ नाले अतिक्रमित आहेत़ यामध्ये ११ हजार १४३ झोपड्यांचा समावेश आहे़ शहरात ६५१, पश्चिम उपनगरे सहा हजार २६१ आणि पूर्व उपनगरे चार हजार २३१ असे एकूण ११ हजार १४३ अतिक्रमण आहेत़बिगर ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांर्गत असलेले प्राधान्याने हाती घेण्यात आलेल्या ७०़४३ कि़मी़ नाल्यांपैकी १९़६६ कि़मी़ नाल्यांचा भाग अतिक्रमित आहे़ त्यावर सहा हजार ३२ अतिक्रमणे आहेत़ यामध्ये पश्चिम उपनगरामध्ये तीन हजार ३१८ आणि पूर्व उपनगरामध्ये एक हजार ५६० आणि मिठी नदी येथे एक हजार १५४ असे एकूण सहा हजार ३२ अतिक्रमण आहेत़असा आहे कृती आराखडापात्र झोपड्यांना सप्टेंबर अखेरीपर्यंत पर्यायी जागा देण्याबाबत निर्णय होणार आहे़प्रथम प्राधान्य देण्यात आलेल्या नाल्यांच्या कामांचे कार्यादेश सप्टेंबर २०१६ पर्यंत दिले जाणार आहेत़१ आॅक्टोबरपासून अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात होणार आहे़
अतिक्रमणे जमीनदोस्त ?
By admin | Published: July 19, 2016 4:21 AM