शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

कुटुंबातील 12 जणांचा अंत

By admin | Published: August 05, 2014 2:53 AM

बचाव कार्याच्या सहाव्या दिवशी सोमवारी माळीण दुर्घटनेत मरण पावलेल्या एकाच कुटुंबातील 12 व्यक्तींसह एकूण 27 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

घोडेगाव (जि. पुणो) : बचाव कार्याच्या सहाव्या दिवशी सोमवारी माळीण दुर्घटनेत मरण पावलेल्या एकाच कुटुंबातील 12 व्यक्तींसह एकूण 27 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सोमवार सायंकाळर्पयत हाती लागलेल्या मृतदेहांची संख्या 134वर पोहोचण्याबरोबरच ही दुर्घटना किती भीषण होती, याचे चित्रही उलगडू लागले आहे. 

एकाच कुटुंबातील जे 12 मृतदेह हाती लागले ते सर्व झांजरे कुटुंबातील आहेत. खचलेल्या डोंगराच्या मागील बाजूला त्यांची शेजारी शेजारी पाच घरे होती. झांजरे कुटुंबियांची घरे उकरत असताना एका घरात लग्न बस्त्याचे सामान सापडले. गाठोडय़ात बांधून ठेवलेल्या साडय़ा व इतर साहित्य आढळून आले. त्यामुळे झांजरे कुटुंब लग्नाचा बार उडविण्याच्या आनंदाच असतानाच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला, हे स्पष्ट झाले.
सलग आठवडाभर चिखल व पाण्यात राहिल्याने सापडणारे मृतदेह अतिशय सडलेल्या  अवस्थेत हाती लागत होते. त्यामुळे ते तातडीने अडिवरे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविले जात असतानाच रुग्णवाहिकेत शवविच्छेदन करण्यात येत होते.
माळीण गावातील सुमारे 42 कुटुंब यामध्ये गाडली गेली. त्यात लेंभे, झांजरे, पोटे यांची कुटुंबे जास्त होती.  त्यांचे नातेवाईक ढिगा:याजवळ उभे राहून आपले घर कधी उकरणार, याची वाट पाहत होते. तसेच, काही नातेवाईक माळीणफाटय़ावर अंत्यसंस्कारासाठी उभे होते. सर्व ग्रामस्थ व नातेवाइकांची माळीणफाटय़ावर असलेल्या शाळेत थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या जवानांनी  व प्रशासनाने शेवटर्पयत हे काम सुरू ठेवावे व गाडला गेलेला प्रत्येक माणूस काढण्याचा प्रय} करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत होते.
दिवसभर घटनास्थळी सात पोकलेन मशिन व दोन डोझरच्या साहाय्याने मदतकार्य सुरू असून जेथे घरे आहेत अशा ठिकाणी उकरून मृतदेह शोधण्याचे काम  दोन पोकलेन मशिन करत आहेत. या मशिनवर चार ते पाच जवान उभे असतात. हे जवान मशिन उकरत असलेल्या मातीवर लक्ष ठेवून आहेत. मृतदेह आढळल्याबरोबर त्याला ढिगा:यातून काढून बॅगमध्ये गुंडाळून रुग्णवाहिकेर्पयत आणत होते. सोमवारी दिवसभर माती उकरताना घरातील साहित्य मोठय़ा प्रमाणात सापडत होते. घरातील भांडीकुंडी, कपडे, कागदपत्रे, भाताच्या कणग्या अशा विविध प्रकारच्या वस्तू सापडत होत्या. यातील महत्त्वाच्या वस्तू बाहेर काढून त्या पोलिसांच्या ताब्यात दिल्या जात होत्या. प्रांत अधिकारी डी. बी. कवितके घटनास्थळी मदतकार्यावर लक्ष ठेवून होते. (प्रतिनिधी)
 
मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी
च्माळीण दुर्घटनेतील बळींच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळण्यासाठी मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी होणार आहे. त्यासाठी आवश्यक नमुने तसेच मृतदेहांची छायाचित्रे, अंगठय़ांचे ठसे आरोग्य विभागाकडून घेतले जात आहेत.
च्आरोग्य विभागाचा अहवाल पोलीस व महसूल विभागाकडे दिला जाणार आहे. दुर्घटनेनंतर आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. आडिवरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रतील 21 गावे व 45 वाडय़ा- वस्त्यांवर जलजन्य व  कीटकजन्य आजाराबाबत आरोग्य संरक्षक व प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहे. साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी 45 आरोग्य पथके नेमण्यात आली आहे. दुर्घटनेच्या परिसरातील प्राथमिक शाळा आणि घरांच्या परिसरात टीसीएल पावडर टाकण्यात आली आहे, असे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नितीन विलोलीकर  व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजीव जाधव यांनी सांगितले. 
 
च्डोंगरचा कडा कोसळून माळीण गाव ढिगा:याखाली गेल्याची भीषण दुर्घटना 3क् जुलै रोजी घडली होती.  तेव्हापासून राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण (एनडीआरएफ) व प्रशासनातर्फे मदतकार्य सुरू आहे. 75 टक्के शोधकार्य पूर्ण झाले असून, मंगळवार सायंकाळर्पयत ही मोहीम संपेल, असा अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे.
च्दुर्घटना घडली त्या दिवशी 17 मृतदेह सापडले होते. त्यानंतर 31 जुलैला 24, 1 ऑगस्ट रोजी 3क्, 2 रोजी 9, 3 रोजी 27; तर 4 रोजी सायंकाळर्पयत 27 मृतदेह सापडले.
 
बळींच्या नावे वृक्ष लागवड 
जुन्नर तालुक्यात ‘माळीण संजीवन स्मारक’ उपक्रमाअंतर्गत बळींच्या नावाने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. मृत व्यक्तीच्या नावाचा फलक संबंधित झाडाजवळ लावण्याचा उप्रकम अतुल बेनके व चित्रपट दिग्दर्शक मंगेश हाडवळे राबविणार आहेत़  या संपूर्ण बागेला ‘माळीण संजीवन स्मारक’ नाव देण्यात
येणार आहे. 15 ऑगस्टला या उपक्रमाद्वारे मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.