मनोर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवर धोक्याचा ठिकाण ठरलेल्या भोपोली फाट्यावर बहिणीला भेटण्यास चाललेले बहीण-भाऊ टेम्पोच्या धडकेने जागीच ठार झाले. या फाट्यावरील हे क्रॉसिंग जीवघेणे ठरले असून आतापर्यंत ६० ते ६५ निष्पाप लोकांचे अपघातात मृत्यू झाले आहेत. उड्डाणपुलासाठी आंदोलन करून सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही.पालघर येथील रहाणारे रत्ना संकर बाडगा वय ५५ व ताई संकर बाडगा हे दोघे बहीण भाऊ आपल्या दुसऱ्या बहिणीला भेटण्यासाठी मोटरसायकलने पालघर विक्रमगड रस्त्या वरून जात असताना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग भपोली फाटा ओलांडत असतांना त्यांना भरधाव वेगात गुजरातकडे जाणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली . त्याधडकेत ते गंभीर जखमी झाले किरण गोवारी यांनी त्यांना मनोर ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र रस्त्यातच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भोपोली फाटा हा मृत्यूचा सापळा बनला आहे त्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात. आतापर्यंत अनेक अपघात होऊन ६० ते ६५ लोकांचा मृत्यू झालेले आहेत त्या ठिकाणी उड्डाण पूल व्हावा यासाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली दाखल घेत नाही म्हणून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली रा. कांग्रेस, कांग्रेस, बी जे पी व इतर सनघटनांचे कार्यकर्ते ग्रामस्थांनी त्याच ठिकाणी रस्ता रोको केला होता तरी उड्डाण पूल राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प यांनी लाल फितीत ठेवला आहे. अजून किती बळी घेणार भोपोली फाटा मनोर पोलीस ठाण्यात मोटर अपघाताचा गुन्हा दाखल केले असून अधिक तपास पो.उ.नि. अक्षय सोनवणे करीत आहे. (वार्ताहर )
बहिणीला भेटण्यासाठी जाणाऱ्या भावा बहिणीचा अंत
By admin | Published: November 09, 2016 3:31 AM