शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

निवडणुकीच्या वर्षात अखेर शालेय वस्तू ऑन टाईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2016 8:37 PM

स्थायी समितीपुढे आणण्यास प्रशासनाला जबाबदार ठरवणाऱ्या शिवसेनेने या प्रकल्पांचे श्रेय मात्र आपल्या खिशात घातले आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 -विकास कामांचे प्रस्ताव घाईघाईने स्थायी समितीपुढे आणण्यास प्रशासनाला जबाबदार ठरवणाऱ्या शिवसेनेने या प्रकल्पांचे श्रेय मात्र आपल्या खिशात घातले आहे. महापालिकेलच्या आगामी निवडणुकीत पक्षाची कामगिरी बेस्ट ठरण्यासाठी पालिका शाळांमध्ये २७ शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वीच स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळेल, असा दावा शिवसेनेने केला आहे. महापालिका शाळांमधील सुमारे चार लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्य देण्यात येतात. मात्र आतापर्यंत अनेक वेळा या वस्तूंना लेटमार्कच लागला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असे. रेनकोट पावसाळ्यानंतर तर पुस्तक परीक्षेनंतर मिळत असल्याने हे साहित्य देण्याचे उद्दिष्ट निष्फळ ठरत होते. परंतु पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करण्याचा सपाटाच पालिकेनं लावला आहे. स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तब्बल १०१५४ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. दोन आठवड्यात तब्बल २६०० कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये असल्याने हा प्रस्ताव राखून ठेवल्यास पुढच्या शैक्षणिक वर्षात पुन्हा विद्यार्थ्यांना शालेय वस्तू उशिरा मिळतील, अशी भीती दाखवण्यात येत आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच शालेय वस्तू खरेदीचे प्रस्ताव मंजूर करून शैक्षणिक साहित्य शाळांना मिळण्यापूर्वीच शिवसेनेने आपली पाठ थोपटून घेतली आहे. असे आहेत शालेय साहित्य पहिली ते दहावीच्या विदयार्थ्यांसाठी गणवेश तसेच बूट आणि मोजे यांच्या खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तसेच कंपास पेटी, प्लास्टिक पट़टी,कलर्स, ड्राईग पेन्सिल, ब्रश,रायटिंगपेन्सिल,खोडरबर,प्लॅ॑स्टिक बॉक्स, बॉलपेन बॉक्स अशाप्रकारे १५ शालेय वस्तू, शालेय दप्तर,पाण्याची बाटली, खाऊचा डबा असा दप्तर संच, वह्यांचे संच तसेच रेनकोट व छत्री आदी शालेय वस्तूंच्या खरेदीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. पुढील दोन वर्षांसाठी हया शालेय वस्तूंची खरेदी करण्यात येत आहे. यासर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्यामुळे जानेवारी महिन्यात याचे कार्यादेश देऊन हे सर्वसाहित्य एप्रिल -मे महिन्यापर्यंत प्रत्येक शाळांना उपलब्ध करून दिले जाईल.त्यानुसार सर्व शालेय साहित्याचे वाटप विदयार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच केले जाईल, असा पालिकेचा दावा आहे १४३ विज्ञान प्रयोगशाळाविदयार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोगांचे प्रात्यक्षिक, वैज्ञानिक उपकरणांची ओळख होणे, वैज्ञानिक साहित्य हाताळण्याचे कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी विज्ञान प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. यासाठी २०१६-१७ मध्ये महापालिकेच्या १०२ प्राथमिक व ४१ माध्यमिक शाळांमध्ये नवीन विज्ञान प्रयोगशाळा निर्माण करण्यात येत आहेत. त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच हे साहित्य विज्ञान प्रयोगशाळेत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.