शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

शिक्षक बदल्यांचा गोंधळ संपेना

By admin | Published: May 18, 2016 9:40 PM

जिल्ह्यांतर्गत आॅनलाईन शिक्षक बदलीतील गोंधळ सुरूच आहे. शिक्षण विभागाच्या यादीतील चुकांमुळे दुसऱ्यांदा बदलीसाठी मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

पुन्हा मुदतवाढ : समायोजन दुरुस्तीत ६७ शिक्षक वाढलेपुणे : जिल्ह्यांतर्गत आॅनलाईन शिक्षक बदलीतील गोंधळ सुरूच आहे. शिक्षण विभागाच्या यादीतील चुकांमुळे दुसऱ्यांदा बदलीसाठी मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. बदली प्रक्रियेत पारदर्शकता राहावी व शासनाने मुदत वाढवून दिल्याने मुदतवाढ देत असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे अध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांनी सांगितले.यानुसार आता २७ व २८ मे रोजी ही प्रक्रिया राबविण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या १० टक्के जिल्ह्यांतर्गत प्रशासकीय बदल्यांना राज्य सरकाने परवानगी दिली आहे. त्यामध्ये प्रशासकीय व विनंती बदल्यांचा समावेश आहे. त्यानुसार इतर सवर्गातील बदल्या सुरळीत पूर्ण झाल्या आहेत. शिक्षक व ग्रामसेवक या महत्त्वाच्या बदल्या बाकी आहेत. सामान्य प्रशासनाने बदल्यांच्या ठरविलेल्या वेळापत्रकानुसार १२ मेपासून ही बदल्यांची प्रक्र्रिया राबविण्याचे ठरविले होते. शुक्रवारी १३ मे रोजी २० बदल्यांसाठी ९१ शिक्षकांना बोलावलण्यात आले. प्रत्यक्षात १ हजार शिक्षक उपस्थित राहिले; त्यामुळे गोंधळ उडाला. अखेर जिल्हा परिषद अध्यक्षांनी लक्ष घालून या बदल्या थांबविल्या व नवे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार २० व २१ रोजी नव्याने प्रकिक्रया राबविण्याचे ठरले होते. यानुसार शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना तीन दिवस शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यास वेळ दिला. मात्र, बुधवार (१६ मे)पर्यंत काही तालुक्यांच्या याद्या आल्या व काही तालुक्यांच्या आल्याच नाहीत. तसेच, प्रत्येकाने वेगवेगळ्या फॉन्टमध्ये याद्या पाठविल्याने त्या एकत्र करताना पुन्हा गोंधळ झाला. दोन दिवसांवर बदली प्रक्रिया असताना अजून यादीतील गोंधळ दूर होत नाही. तसेच, शासनाने या प्रकियेला ५ जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याने शुक्राचार्य वांजळे यांनी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्याशी चर्चा करून यापुढे त्यात कोणतीही चूक राहू नये म्हणून पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.यानुसार आज जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर दहा वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांची तात्पुरती यादी जाहीर करण्यात आली आहे. यावर पुन्हा हरकती व सूचना मागवून अंतिम यादी २४ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. ५ हजार २२१ बदलीपात्र शिक्षकजिल्हा परिषद शाळांत ११ हजार ४४३ एकूण शिक्षक असून, त्यांतील १० वर्षे सेवा पूर्ण झालेले ५ हजार २२१ शिक्षक बदलीला पात्र आहेत. यात ४ हजार ८१२ शिक्षक बिगरआदिवासी व ४०९ शिक्षक आदिवासी भागातील आहेत.समायोजनही पुन्हा करण्याची वेळआॅनलाईन शिक्षक संचमान्यतेनुसार तालुक्यानुसार शिक्षकांचे गेल्या आठवड्यात समायोजन करण्यात आले होते. मात्र, हे समायोजन झाल्यानंतर शासनाने पटसंख्येऐवजी शाळाखोल्याच्या संख्येवर शिक्षक निर्धारित अशी दुरुस्ती केली; त्यामुळे जिल्ह्यात ६७ शिक्षक वाढले आहेत. यामुळे शिक्षक अतिरिक्त झाल्याने त्याला दुसरी शाळा देण्यात आली. आता त्याच शाळेत शिक्षक जागा रिक्त झाल्याचे काही शाळांत प्रकार झाले आहेत. त्यामुळे हे समायोजन पुन्हा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. तालुकास्तरावर या अडचणी पहिल्यांदा सोडवाव्यात, असे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया निकोप व पारदर्शक व्हावी, हीच आमची अपेक्षा आहे. कोणालाही आक्षेप घेण्यास वाव राहता कामा नये. त्यात शासनानेही ५ जूनपर्यंत तालुकास्तरावरील बदल्यानां मुदतवाढ दिल्याने आम्ही मुदतवाढ देत आहोत.-शुक्राचार्य वांजळे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषदअध्यक्ष-उपाध्यक्षांचा पारदर्शक बदल्या व्हाव्यात, हा आग्रह आहे; पण शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षक धास्तावला आहे. रोस्टर पूर्ण करून रिक्त जागा तत्काळ भराव्यात.-बाळासाहेब मारणे, अध्यक्ष, शिक्षक संघशिक्षक सेवाज्येष्ठता यादी ही मॅन्युअल पद्धतीने केली जाते. यासाठी कोणतीही संगणकप्रणाली नाही. त्यामुळे यादीत काही चुका होत आहेत.- मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)