मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’संदर्भात दिलेल्या निकालामुळे राज्यातील सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलेले आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यातील वैद्यकीय प्रवेश हे एमएच-सीईटी मार्फतच घेण्याचा छातीठोक दावा करणारे सरकारही ‘नीट’ची तयारी करण्याचा सल्ला देत आहे. एकीकडे केंद्रीय स्तरावर वैद्यकीयमंत्र्यांच्या बैठका सुरू असून, दुसरीकडे राज्य सरकार सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना १९ मे पासून आॅनलाइन आणि टी.व्ही.च्या माध्यमातून ‘नीट’चे प्रशिक्षण देण्याची तयारी करत आहे. सोमवारी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीतही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील पालक आणि विद्यार्थी नेमके ‘सीईटी’वर अवलंबून राहायचे की, ‘नीट’ची तयारी करायची? या संभ्रमात असल्याचे चित्र आहे. परिणामी, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाच्या मनात नेमकी काय खदखद सुरू आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला आहे. (प्रतिनिधी)
‘नीट’ची धाकधूक संपेना!
By admin | Published: May 17, 2016 3:46 AM