मुंबई : मेक इन इंडिया सप्ताहात राज्याच्या महानिर्मिती कंपनीने ऊर्जानिर्मितीसाठी १.४६ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बाबत माहिती दिली. एकूण ६४ गुंतवणूकदार कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले. त्यात प्रामुख्याने औष्णिक प्रकल्प क्षेत्रात मे. सी.एम.ई.सी. चायना (डायना ईपीएल), मे. टेलर पॉवर, मे. टोरँट पॉवर, मे. डेल्टा मेकॉन्स इंडिया, मे. तोशिबा-जीएसडब्ल्यू या कंपन्यांशी, सौर उर्जा क्षेत्रात मे. अदानी ग्रीन एनर्जी लि., मे. राजलक्ष्मी पॉवर लि., मे. हिंदुस्थान मेगापॉवर लि., मे. सस्टेनेबल बिल्डिंग सिस्टीम, मे. वारी एनर्जीज लि., मे. विंध्यवासिनी मेगास्ट्रक्चर लि., मे. अथा सोलर, मे. एन.एच.पी.सी., मे. लँको, मे. के.सी. पॉवर इन्फ्रा, मे. सन एडिसन, या कंपन्यांशी तर फ्लाय अॅशसंबंधी मे. अंबुजा सिमेंट, मे. इंटिग्रेटेड सिस्टीम, नागपूर या कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले. त्याचप्रमाणे कोल वॉशरीजसंबंधी मे. भाटिया, मे. गुप्ता ग्लोबल, मे. थीम लॉजिस्टिक्स, मे. एस.एम.एस. लि., व सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पासंबंधी मे. एस.एम.एस. इन्फ्रा लि. या कंपन्यांशी करार करण्यात आले. हे सर्व प्रकल्प मार्गी लागल्यानंतर राज्यातील उर्जाक्षेत्राचे चित्र आमूलाग्र बदलेल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
राज्यात ऊर्जा ‘महानिर्मिती’ - बावनकुळे
By admin | Published: February 17, 2016 3:14 AM