मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकऱणी ईडीकडून गुन्हा दाखल झाला आहे. त्याचसोबत शासकीय निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेमारी केली आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेले ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. मुंबई, पुणे, रत्नागिरी याठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचले आहेत. सीआरपीएफ जवानाच्या तुकड्याही त्यांच्यासोबत आहेत. वांद्रे येथील खासगी घरातही ईडीच्या अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. परब यांच्या संबंधित ७ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. अनिल देशमुख प्रकरणाचे तपास अधिकारी शिवालय बंगल्यात पोहचले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अनिल परब यांची चौकशी करण्यात येऊ शकते.
या प्रकरणी भाजपाने सरकारवर हल्लाबोल केला आहे. अनिल परबांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला आहे. २५ कोटी रिसोर्ट बांधले. त्या बांधकामाचा खर्च कोणी केला? सचिन वाझेकडून १०० कोटी वसुली येत होती त्यातही अनिल परब यांचे नाव होते. उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांनी माझी हत्या करण्याचा प्रयत्न झाला. माझ्या नावानं बोगस एफआयआर करण्यात आला. पोलिसांना कुणाचा फोन येत होता? अनिल परबांनी बॅग भरायला घ्यावी. अनिल परब हे उद्धव ठाकरेंचे राइट हँण्ड आहे असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
तसेच सरकारने मुंबईकर, महाराष्ट्र जनतेचा कोट्यवधीचा पैसा खाल्ला आहे. हे पैसे पुन्हा जनतेला मिळाले पाहिजे. यशवंत जाधव यांच्या डायरीत केबल मॅनला ५० लाख रुपये दिले याचाही खुलासा व्हायला हवा. नवाब मलिकांच्या बाबतीत कोर्टाने दाऊदसोबत थेट संबंध असल्याचं म्हटलं. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसोबत संबंध ठेवायचे आणि जनतेचा पैसा लुबाडायचा हे सरकारचं काम आहे असा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. ईडीनं संपूर्ण माहिती घेऊन अनिल परब यांच्या ७ ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत. ज्याठिकाणी धाडी टाकल्या तिथे तथ्य आढळलं आहे. मलिकांच्या वेळीही सरकारने पाठराखण केली. मात्र त्यांचे दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी आढळले असं विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले.