शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अभियांत्रिकी प्रवेश ५ जूनपासून

By admin | Published: May 27, 2017 1:00 AM

प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची येत्या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची येत्या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना दि. ५ ते १७ जून या कालावधीत प्रवेश अर्ज भरता येणार आहे. तर दि. १ आॅगस्ट रोजी अभियांत्रिकीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे.इयत्ता बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याने राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षाने अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. कक्षामार्फत राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील सुमारे दीड लाख जागांसाठी केंद्रीय पद्धतीने आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया (कॅप) राबविली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सुरूवातीला आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. या प्रक्रियेत केंद्रीय पद्धतीने तीन फेऱ्या होणार आहे. तर जे विद्यार्थी विविध कारणांमुळे दि. १७ जून या मुदतीत अर्ज करू शकणार नाहीत. त्यांच्यासाठी कॅप फेऱ्या झाल्यानंतर संस्थास्तरावर स्वतंत्र फेऱ्या घेतल्या जाणार आहे. सुमारे दोन महिने ही प्रवेश प्रक्रिया चालणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी २०१७ या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाच्या नोंदणीसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. जेईई (मुख्य) परीक्षेतून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क आकारले जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. या तारखा ठेवा लक्षातदि. ५ ते १७ जून - प्रवेश अर्जाची आॅनलाईन नोंदणी. आवश्यक कागदपत्रांची तपासणी. प्रवेश अर्ज अंतिम करणे.दि. १९ जून - तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध दि. २० ते २१ जून - गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणेदि. २२ जून - अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध. पहिल्या प्रवेश फेरीसाठी जागांची यादी प्रसिद्ध.दि. २३ ते २६ जून - आॅनलाईन पसंती अर्ज भरून अंतिम करणे. दि. २८ जून - पहिल्या फेरीची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध दि. २९ जून ते ३ जुलै - निवड यादीनुसार ‘एआरसी’वर जाऊन प्रवेश निश्चिती.दि. ५ जुलै - दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करणेदि. ५ ते ८ जुलै - आॅनलाईन पसंती अर्ज भरणे व अंतिम करणे. दि. १० जुलै - दुसऱ्या फेरीची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध दि. ११ ते १४ जुलै - निवड यादीनुसार ‘एआरसी’वर जाऊन प्रवेश निश्चिती. (पहिल्यांदाच निवड झाली असल्यास)दि. १६ जुलै - तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करणेदि. १६ ते १९ जुलै - पसंती अर्जात बदल करणे. स्लायडिंग, फ्लोटिंग किंवा फ्रिजिंग हे पर्याय वापरता येतील. दि. २१ जुलै - तिसऱ्या फेरीची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध दि. २२ ते २४ जुलै - निवड यादीनुसार ‘एआरसी’वर जाऊन प्रवेश निश्चिती. (पहिल्यांदाच निवड झाली असल्यास)दि. २५ ते २९ जुलै - प्रवेश निश्चित केलेल्या संस्थेत जाऊन आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेश अंतिम करणे.संस्थास्तरावर स्वतंत्र फेऱ्यातीन कॅप फेऱ्यांसाठी दि. ५ ते १७ जून या कालावधीत आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. मागील वर्षी काही विद्यार्थ्यांना कॅप फेऱ्यांसाठी नोंदणी करण्यात काही अडचणी आल्याने त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता आले नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र फेरी घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार मागील वर्षी या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र फेरी घेण्यात आली. यापार्श्वभूमीवर यंदा अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करून संस्थास्तरावर फेऱ्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅप फेऱ्यांमधून रिक्त राहणाऱ्या जागांवर या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळतील. दि. १८ जुनपासून १० आॅगस्टपर्यंत या विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज भरून सादर करता येईल, असे सहसंचालक दयानंद मेश्राम यांनी सांगितले. शासकीय व शासकीय अनुदानित संस्थांसाठीची अतिरिक्त फेरी दि. ३१ जुलै - रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करणेदि. ३१ जुलै ते १ आॅगस्ट - आॅनलाईन पसंती अर्ज भरणे व निश्चित करणे. (कॅप गुणवत्ता क्रमांक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी)दि. ३ आॅगस्ट - तात्पुरती निवड यादीदि. ४ ते ६ आॅगस्ट - निवड झालेल्या संस्थांमध्ये प्रवेश निश्चित करणेसंकेतस्थळ www.dtemaharashtra.gov.in/fe2017