लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यभरातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया ५ जूनपासून आॅनलाइन पद्धतीने सुरू होत असल्याचे राज्य सीईटी सेलतर्फे गुरुवारी जाहीर केले. ५ जूनपासून आॅनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुविधा केंद्राची सोय कोी आहे. अर्ज भरण्यासाठी असलेली केंद्रे ही सुटीच्या दिवशीही कार्यरत राहणार आहेत. राज्य सीईटी सेलतर्फे जाहीर केलेल्या या वेळापत्रकानुसार बारावी उत्तीर्ण आणि सीईटी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्यासाठीच्या केंद्रांची यादी www.dtemaharashtra.gov.in/fe2017 या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. सीईटी सेलतर्फे जाहीर करण्यात आलेले संभाव्य वेळापत्रकआॅनलाइन अर्ज : ५ जून ते १७ जूनकागदपत्रांची तपासणी, सुधारणा - ५ जून ते १७ जूनसंभाव्य गुणवत्ता यादी : १९ जूनयादीवर हरकती मांडणे - २० जून ते २१ जून (सायं. ५ पर्यंत)अंतिम गुणवत्ता यादी - २२ जूनकॅप राउंडचे संभाव्य वेळापत्रककॅप राउंडसाठी यादी प्रसिद्ध : २२ जूनआॅप्शन फॉर्मचे आॅनलाइन सादरीकरण : २३ जून ते २६ जूनकॅप राउंडसाठी तात्पुरती यादी प्रसिद्ध - २८ जून संध्या. ५ वाजेपर्यंत एआरसी सेंटरवर रिपोर्टिंग - २९ जून ते ३ जुलैकॅप राउंड दोनसाठी यादी - ५ जुलैआॅप्शन फार्मचे आॅनलाइन सादरीकरण - ५ जुलै ते ८ जुलैतात्पुरती यादी - १० जुलैएआरसी सेंटरवर रिपोर्टिंग - ११ जुलै ते १४ जुलैकॅप राउंड तीनसाठी यादी - १६ जुलैआॅप्शन फॉर्ममध्ये बदल करण्यासाठी वेळ - १६ जुलै ते १९ जुलैतात्पुरती यादी - २१ जुलैएआरसी सेंटरवर रिपोर्टिंग - २२ जुलै ते २४ जुलै
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ५ जूनपासून सुरू
By admin | Published: May 26, 2017 4:16 AM