पुणे : राज्यातील अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया गुरुवारपासून सुरू होणार आहे. याबाबतचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) बुधवारी जाहीर केले. ही प्रक्रिया दि. १ आॅगस्टपर्यंत चालणार असून दि. १ आॅगस्ट रोजी शैक्षणिक कामकाजाला सुरुवात होईल. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यात ठिकठिकाणी सुविधा केंद्रेही सुरू करण्यात आली आहेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यानंतर डीटीईमार्फत अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. राज्यातील शासकीय, शासकीय अनुदानित, विद्यापीठातील विभाग, आयसीटी मुंबई आणि खासगी विनाअनुदानित संस्थांमधील सुमारे १ लाख ५४ हजार जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया होणार आहे. ‘डीटीई’ प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया २ जूनपासून सुरू होईल. विद्यार्थ्यांना डीटीईच्या संकेतस्थळावरून प्रवेशाची आॅनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रकदि. २ ते १६ जून : आॅनलाइन अर्ज नोंदणीदि. २ ते १७ जून : सुविधा केंद्रांवर कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जनिश्चितीदि. १९ जून : तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध दि. १९ ते २१ जून : सुविधा केंद्रांवर हरकती नोंदविणेदि. २२ जून : अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, पहिल्या ‘कॅप’ फेरीसाठी प्रवर्गनिहाय जागांचे वितरण प्रसिद्ध होणारदि. २२ जून ते २५ जून : कॅप १, २, ३ साठी पसंतीक्रम भरणेदि. २७ जून : कॅप एकसाठी तात्पुरती प्रवेश यादीदि. २८ जून ते ५ जुलै : अॅडमिशन रिपोर्टिंग सेंटर (एआरसी)वर जाऊन मूळ कागदपत्रे सादर करणे. फ्रीज, स्लाईड किंवा फ्लोटचा पर्याय निवडणेदि. ७ जुलै : कॅप दोनसाठी तात्पुरती प्रवेश यादी प्रसिद्धदि. ८ ते १२ जुलै : एआरसीवर जाऊन मूळ कागदपत्रे सादर करणे व पर्याय निवडणेदि. १४ जुलै : कॅप तीनसाठी तात्पुरती प्रवेश यादी प्रसिद्धदि. १५ ते १८ जुलै : एआरसीवर जाऊन मूळ कागदपत्रे सादर करणे व पर्याय निवडणेदि. २० जुलै : कॅप चारसाठी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करणेदि. २१ ते २४ जुलै : कॅप चारसाठी पसंतीक्रम भरणे दि. २६ जुलै : कॅप चारसाठी तात्पुरती प्रवेश यादी प्रसिद्ध करणेदि. २७ ते २९ जुलै : एआरसीवर जाऊन मूळ कागदपत्रे सादर करणेदि. २८ जुलै ते ६ आॅगस्ट : सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश यादीनुसार संबंधित संस्थेत जाऊन प्रवेश निश्चित करणे
अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया आजपासून
By admin | Published: June 02, 2016 12:45 AM