शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

उत्साही वातावरणात 2641 भाग्यवान झाले निश्चित

By admin | Published: June 26, 2014 2:33 AM

म्हाडाच्या 2641 घरांची सोडत बुधवारी निर्विघ्न पार पडली. हा सोहळा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात उत्साही वातावरणात पार पडला.

मुंबई : स्टेजवरील मोठय़ा स्क्रीनवर यशस्वी अर्जदारांचे नाव, छायाचित्र झळकताच निवेदकाच्या घोषणोमुळे त्यांच्या चेह:यावर उमटलेले हास्य, अभिनंदनपर वाजवली जाणारी तुतारी, ढोल-ताशे आणि टाळ्यांचा गजर तर नंबर न लागलेल्या अर्जदारांची निराशा, अशा संमिश्र वातावरणात म्हाडाच्या  2641 घरांची सोडत  बुधवारी निर्विघ्न पार पडली. हा सोहळा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात उत्साही वातावरणात पार पडला. 
  म्हाडाने पहिल्यांदा तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केल्याने विजेत्यांच्या नावाबरोबर  फोटोही पडद्यावर प्रकट होत होते. त्याचप्रमाणो ‘वेबकॉस्टिंग’ प्रणालीच्या वापरामुळे कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण इंटरनेटवर पाहण्यास उपलब्ध केले होते.  त्यामुळे  उपस्थित न राहता अर्जदारांना कार्यालयात किंवा घरबसल्या संगणक, मोबाइलवर कार्यक्रम पाहता आला. 2641 घरांसाठी एकूण 93 हजार 13क् इच्छुक होते. 
लोकसभा निवडणूक, घरांच्या किमतीमुळे अल्प प्रतिसाद आदी बाबींमुळे यंदाची लॉटरी लांबणीवर पडली, मात्र सोडतीवेळी तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरामुळे सोडतीचा सोहळा वैशिष्टय़पूर्ण ठरला. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंबई मंडळांचे सभापती युसूफ अब्राहनी यांच्या प्रमुख उपस्थितीत संगणकीय सोडतीची सुरुवात करण्यात आली. मुंबईतील मानखुर्द येथील अत्यल्प उत्पन्न गटातील अनुसूचित जातीसाठी आरक्षित कोटय़ातील जागेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 814 घरांच्या अन्य  योजनांच्या सोडती जाहीर केल्या. विजेत्याचे नाव, छायाचित्र, सदनिकेचा नंबर, प्रतीक्षा यादीतील अर्जदार पडद्यावर दाखवले जात होते.  दुपारी बारार्पयत मुंबईतील घरांचा ड्रॉ पूर्ण झाला. त्यानंतर   दुपारी अडीच वाजता दुस:या सत्रत कोकणातील विरार-बोळिंजमधील 1716 व वेंग्युल्र्यातील 111 घरांची सोडत निघाली. या वेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष सतीश गवई, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव देबशिष चक्रवर्ती, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अगरवाल, सुधारणा समितीचे अध्यक्ष सुरेशकुमार, उच्चस्तरीय देखरेख समितीचे राज्य माहिती अधिकारी मोइज हुसेन, मुख्य अधिकारी एन.के. सुधांशू, डॉ. भाऊसाहेब दांगडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 
सभागृह व बाहेरच्या पटांगणात शामियाना उभारून जागोजागी साइड स्क्रीनही लावण्यात आली होती. मात्र इंटरनेटद्वारे मोबाइलवर त्याचे थेट प्रक्षेपण पाहणो उपलब्ध असल्याने बहुतांश जणांनी त्याकडे पाठ फिरविली. दिवसभरात 24 हजार जणांनी म्हाडाच्या संकेतस्थळावरील ‘वेबकॉस्टिंगला’ भेट दिली,  17 हजार जणांनी प्रक्षेपण पाहिल्याचे सांगण्यात आले. सोडतीचा सर्व निकाल  सायं. साडेसहाच्या सुमारास त्यांची माहिती म्हाडाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली.
 
अशी होती सोडतीची पद्धत
च्घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्यांची सर्व माहिती एका सॉफ्टवेअरमध्ये घालून ते संगणक गुरुवारी सील करण्यात आले होते. सोडतीसाठी  उपस्थित असलेल्या अर्जदारांपैकी तीन जणांना पंच बनविण्यात आले.
 
च्त्यांनी सांगितलेल्या नंबरवरून ‘सीड व्हॅल्यू’ निश्चित करून त्याद्वारे प्रत्येक योजनेचा निकाल जाहीर केला जात होता. त्यानंतर त्यांची प्रिंट काढून अधिकारी व पंचांच्या स्वाक्ष:या घेतल्या जाई. थोडय़ाच वेळात हा निकाल शामियान्यातील बोर्डवर लावला जात असे.
 
जगदाळे दोनदा विजयी! 
मुंबई मंडळांचे सहमुख्य अधिकारी डी.के. जगदाळे दहिसर शैलेंद्रनगर येथील उच्च उत्पन्न गटाच्या योजनेत शासकीय कर्मचा:यांसाठीच्या कोटय़ातून विजेते ठरले. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या लॉटरीत त्यांना पवई -तुंगा येथे घर लागले आहे.
 
3 वर्षापूर्वी एका जवळच्या नातेवाइकांच्या नावे आपण भरलेला अर्ज यशस्वी ठरल्यानंतर त्यांनी विश्वासघात करीत घराची मालकी देण्यास नकार दिला. मात्र तरीही निराश न होता नशिबावर विश्वास ठेवून दरवर्षी अर्ज करीत होतो. यावेळी स्वत:ला लॉटरी लागल्याने खूप आनंद झाला आहे. 
 
स्वत:चे घर नसल्याने लगA लांबणीवर टाकले होते. दरवर्षी मित्रंसमवेत अर्ज करीत होतो. यावेळी नशिबाने साथ दिल्याने प्रेमविवाहाची तारीख लवकरच निश्चित करणार आहे.
 
काही वर्षापासून अर्ज करूनही नंबर लागत नव्हता. मात्र म्हाडाच्या पारदर्शी संगणकीय सोडतीवर विश्वास होता. आज यशस्वी ठरल्याने तो सार्थ ठरला असून त्यामुळे खूप आनंदी झालो आहे.