पुणो : उद्योकांनी केलेले संशोधन मेक इन इंडियासाठी जमेची बाजू असून, यातून निर्माण झालेल्या यंत्रंचा, उपकरणांचा वापर दैनंदिन जीवनात होऊ शकेल, असे मगरपट्टा टाऊनशिपचे अध्यक्ष सतीश मगर यांनी आज येथे सांगितले.
पृथ्वी या क्षेपणाासाठी आवश्यक असलेल्या हलक्या वजनाच्या यंत्रची अभिमानास्पद निर्मिती करणा:या उद्योजकांपासून चिक्कीसाठी लाहय़ा बनविणारे यंत्र तयार करणा:या उद्योजकार्पयत काही ी-पुरुष उद्योजकांना मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, अॅग्रीकल्चर या संस्थेतर्फे आज येथील शानदार समारंभात गौरविण्यात आले. संशोधकवृत्ती असलेल्या उद्योजकांना गौरविण्याचा 67 वा पारितोषिक समारंभ मगर यांच्या हस्ते पार पडला. बक्षिसांचे प्रायोजक प्रदीप राठी, चेंबरचे महासंचालक अनंत सरदेशमुख उपस्थित होते.
नवे उत्पादन बाजारपेठेत आणून 3 वर्षे यशस्वी विक्रय केलेल्या उद्योजकांना गो. स. पारखे स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा या पारितोषिकासाठी कोणत्याच उद्योजकाची निवड झाली नाही. नव्या उत्पादनासाठीचे हरि मालिनी जोशी स्मृती पारितोषिक स्काय इलेव्हेटर्स आणि हॅरिसन कॉर्पोरेशन या कंपन्यांना विभागून देण्यात आले. या कंपन्यांचे अध्यक्ष अनुक्रमे आर. एच. मोरे, रवींद्र गद्रे यांनी ते स्वीकारले. रमाबाई जोशी पारितोषिक महिला उद्योजक न्यूटन सॉफ्टवेअरच्या संचालक नीलिमा निवर्गी आणि नॅशनल टॉक्सिकोलॉजी सेंटरच्या किशोरी आपटे यांना देण्यात आले. आर. जे. राठी स्मृती पारितोषिक गॅब्रिएल इंडिया या कंपनीच्या अधिका:यांनी स्वीकारले.
(प्रतिनिधी)
1 एक्सलन्स अॅवॉर्ड - केपीआयटी टेक्नॉलॉजीस, रेणुका कृष्णा,
तुषार जुवेकर.
2 स्पेशल अॅवॉर्ड -साईल, रोऊकेरा स्टील प्लांट,धीरेंद्र मिश्र.
3 सीएसआर इनिशिएटिव्ह अॅवॉर्ड - रिलायबल अॅटोटेक, आनंद देशपांडे.
4 अॅप्रिसिएशन सर्टिफिकेट - म¨हंद्रा इंटरट्रेड, दिवाकर श्रीवास्तव आणि स्टरलाईट टेक्नॉलॉजीस, श्वेता आगरवाल, मैत्रेयी चितळे, चंद्रकांत पाटील, अवेध गुप्ता.
5 स्पेशल सर्टिफिकेट- रॅमलेक्स प्रा.लि, अविनाश जोगदंड.
4हलक्या वजनाच्या यंत्रची अभिमानास्पद निर्मिती करणा:या उद्योजकांपासून चिक्कीसाठी लाहय़ा बनविणारे यंत्र तयार करणा:या उद्योजकांचा सत्कार
467 वा पारितोषिक वितरण समारंभ