सध्या सोनी टीव्ही (Sony TV) वर येणारा कार्यक्रम शार्क टँक इंडिया (Shark Tank India) हा अतिशय लोकप्रिय झालाय. यामध्ये असलेले जज म्हणजेच शार्क्स अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करून स्टार्टअप मोठं करण्यासाठी मदत करत आहेत. शार्क टँक इंडियामध्ये आलेल्या नाशिकमधील इलेक्ट्रीक बाईक तयार करणाऱ्या कंपनीची पर्यायवर मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी २८ जानेवारी रोजी रिव्हॅम्प या कंपनीच्या कारखान्याला भेट दिली.
आदित्य ठाकरे हे बऱ्याच कालावधीपासून राज्याच्या इलेक्ट्रीक व्हेईकल धोरणासाठी काम करत आहेत. तसंच त्यांनी नुकतंच मुंबईत ९०० इलेक्ट्रीक एसी डबलडेकर बसेस आणण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांनी शार्क टँक इंडियामध्ये आलेल्या नाशिकच्या स्टार्टअप कंपनीला भेट दिली. शार्क टँक इंडियाच्या एका क्लिपमध्ये आपल्याला याची माहिती मिळाली आणि ही कंपनी भारतीय बनावटीच्या बाईक्सचं उत्पादन करते, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलंय.