वाशिम: राज्यभरातील शालेय विद्यार्थी यंदापासून पर्यावरणाचे धडे गिरविणार आहेत. महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ, वॉटर शेड ऑर्गनायझेशन तथा सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने चालु शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी शाळेची जैवविविधता नोंदवही हा उपक्रम राबविला जाणार असून, या उपक्रमात तब्बल आठ हजार शाळांचा समावेश करण्यात आला असून पहिली ते दहावीपयर्ंतच्या विद्यार्थ्यांना सहभागाची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून परिसरातील जैवविविधतेची ओळख व्हावी, त्याचे संवर्धन करण्याची सवय लागावी,वातावरणातील बदल, पर्यावरणाची हानी, जैवविविधतेत होणारी घट व त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आदी बाबींची समज यावी या हेतूने महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ, वॉटर शेड ऑर्गनायझेशन तथा सामाजिक वनीकरण विभागाने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जैवविविधता नोंदवहीचा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. सदर उपक्रमाअंतर्गत शाळेच्या परिसरातील जैवविविधता, वृक्ष, पक्षी, प्राणी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी यांच्या नोंदी विद्यार्थी स्वत: करणार असून, त्यामुळे परिसरातील जैवविविधतेची माहिती संकलित होणार आहे. पाठ्यपुस्तकात शिकविल्या जाणार्र्या पर्यावरण अभ्यासक्रमाला यामुळे बळ मिळणार असून, विद्यार्थ्यांमध्ये निसगार्ची गोडीदेखील निर्माण होणार आहे. यात केवळ माहिती गोळा न करता पर्यावरण संवधर्नावरही भर दिला जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे निसर्ग भ्रमंती क्षेत्रदेखील निश्चित करण्यात आले आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे ‘धडे’
By admin | Published: July 08, 2014 10:03 PM