जळगाव : देशभरातील ६१ लाख ५० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचे सभासदत्व देण्यात येणार आहे. त्यांचा या निधीतील स्वहिस्सा शासन भरणार असल्याची माहिती केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनचे विश्वस्त प्रभाकर बाणासुरे यांनी ‘लोकमत’ला दिली.या कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळावे, त्यांना भविष्य निर्वाह निधी लागू करावा यासाठी कर्मचारी संघटनांकडून पाठपुरावा सुरू होता. त्यावर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत गुरुवारी चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कामगार मंत्री दत्तात्रय बंडारू होते. (प्रतिनिधी)
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ईपीएफचा लाभ
By admin | Published: April 01, 2017 3:32 AM