- जितेंद्र कालेकर
ठाणे, दि. 23 - एकीकडे अडीच हजार कोटींच्या सुमारे 23 टन बेकायदेशीर इफेड्रीनप्रकरणी जयमुखीसह दहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची तयारी ठाणे पोलिसांनी केली आहे. तर दुसरीकडे यातील आरोपींचा ताबा आता गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने ठाणे न्यायालयाने मागितला. त्यानुसार एव्हॉनचा माजी संचालक मनोज जैनसह तिघांचा ताबा ठाणे न्यायालयामार्फत गुजरात पोलिसांनी घेतला आहे.एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या सोलापूरच्या कंपनीत खोकल्यावरील औषधासाठी इफेड्रीन तयारी करण्याची परवानगी घेऊन यातील टाकाऊ इफेड्रीनवर प्रक्रीया करुन त्याची जैन आणि त्याच्या साथीदारांनी देश विदेशात तस्करी केली. इफेड्रीनच्या विक्रीसाठी घाऊक व्यापा:याच्या शोधात असलेल्या सागर पोवळे आणि मयूर सुखदरे या दोघांना ठाण्यातून अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीत ही बाब उघड झाली. त्यांनीच दिलेल्या माहितीच्या आधारे एव्हॉनवर छापा टाकून राजेंद्र डिमरी आणि स्वामी यांची धरपकड केली. त्यापाठोपाठ कंपनीचा सल्लागार पुनित ङ्म्रींगी सह दहा जणांना पोलिसांनी अटक केली. त्याचदरम्यान गुजरात पोलिसांनीही इफेड्रीन प्रकरणी काही जणांना अटक केली. एव्हॉनमधूनच हे इफेड्रीन गुजरातमध्येही वितरीत झाले असून त्यात पुनित ङ्म्रींगी, जयमुखी आणि मनोज जैन यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून आणखी महत्वपूर्ण माहिती काढण्यासाठी त्यांचा ताबा हवा असल्याचे गुजरात पोलिसांनी ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांच्या निदर्शनास आणले. न्यायालयाने ही बाब मान्य करुन आधी पुनितचा ताबा दिला. पुनितची दोन दिवस चौकशी केल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. त्याच्यापाठोपाठ बुधवारी पुन्हा जैन आणि जयमुखी या दोघांचा चौकशीसाठी ताबा देण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने त्या दोघांनाही गुजरात पोलीसांची कोठडी दिली. ठाणो जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर कारागृहाने त्या दोघांचाही ताबा बुधवारी सायंकाळी गुजरात पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रंनी दिली. उर्वरित सात आरोपींकडेही गुजरातच्या पोलिसांकडून चौकशी केली जाणार असल्याचे एका वरीष्ठ अधिका-याने सांगितले.
माहितीची देवाण-घेवाण नाही..गुजरात पोलिसांनी नेमकी कोणत्या कारणास्तव मनोज जैनसह इतर आरोपींचा ताबा न्यायालयातून मागितला. याबाबतची कोणतीच माहिती ठाणो पोलिसांकडे नव्हती. कारवाई एकाच कंपनीची आणि एकाच मादक पदार्थाची अर्थात इफेड्रीनची आहे. तरीही दोन्ही पोलिसांमध्ये फारसा संवाद होत नसल्याचेही या अधिका-याने सांगितले.