किशोर राठोड परदेशात गेल्याची दिली माहितीजितेंद्र कालेकरठाणो : सुमारे एक टन तीनशे किलोच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी वॉन्टेड आरोपी किशोर राठोड हा केनियात गेला होता, याला पुष्टी देणारा जबाब गुजरात येथून आलेल्या त्याच्या आई वडीलांनी ठाणो पोलिसांना दिला आहे. त्याचे वडील तथा गुजरातचे माजी आमदार भावसिंग राठोड यांच्यासह चार जणांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चौकशी केली. या चौकशीत त्यांनी ही माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय ड्रगमाफिया विकी गोस्वामी, ममता कुलकर्णी, किशोर राठोड, सुशीलकुमार, डॉ. अब्दुल्ला आणि त्याचे दोन साथीदार अशा सात फरारी आरोपींचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. त्यातील किशोरच्या शोधासाठी गेल्या आठवडयात ठाणो पोलीस गुजरातमध्ये गेले होते. त्यांनी ठाण्यात चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावल्यानंतर राठोड कुटूंबीय ठाण्यात आले होते. गेली तीन ते चार दिवस त्यांच्याकडे चौकशी झाली. किशोरचे वडील माजी आमदार भावसिग, त्याची आई देवराणी, पत्नी सोनल आदींचा यात समावेश आहे.
तो विकी गोस्वामीच्या तसेच आणखी कोणा कोणाच्या संपर्कात होता का? परदेशी जात होता का? परदेशी जाण्यासाठी घरातून नेमकी तो कधी गेला ? त्याचा आता तुमच्याशी संपर्क आहे का? आदी प्रश्न या कुटूंबियांकडे पोलिसांनी केले. याबाबत माहिती देतांना तो परदेशी गेला होता, या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. मात्र विकी गोस्वामीशी त्याचा संबंध आहे की नाही? त्यांची केनियात बैठक झाली की नाही? तो आता संपर्कात आहे की नाही? या प्रश्नांवर मात्र त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याची माहिती वरीष्ठ पोलीस अधिका:याने दिली. त्याचा काहीच संपर्क नसून संपर्क झाल्यास तसे कळवू अशी ठराविक साच्यातील उत्तरे त्यांनी दिली. तसेच तो अशी काही तस्करी करीत असेल असेही माहिती नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. अर्थात या माहितीने समाधान झाले नसल्यामुळे या कुटूंबियांना पुन्हा ठाण्यात चौकशीला येण्यासाठी समन्स बजावल्याची माहिती सूत्रंनी दिली.................काय आहेत किशोरवर आरोप..* विकी गोस्वामी, ममता कुलकणी, एव्हॉनचा संचालक मनोज जैन यांच्याबरोबरच्या बैठकीत किशोर राठोडचा समावेश.* एव्हॉनमधील 13क्क् किलो इफेड्रीन केनियात पाठविण्यासाठी गुजरातला पाठविले. * इफेड्रीन वॉश करुन त्याची तस्करी करणो असे आरोप किशोरवर आहेत.