सोलापूर : 'फोनी'चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या पश्चिम बंगाल, ओरिसा आणि आंध्र प्रदेश राज्यातील नागरिकांना मदत करण्याचा ओघ वाढत आहे़ मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातील सामाजिक संस्था, संघटना व अन्य लोकांकडून दिली जाणारी मदत विनाभाडे रेल्वे प्रशासन संबंधित लोकांपर्यंत पोहोचविणार असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
दरम्यान, ३ मे रोजी पश्चिम बंगाल, ओरिसा व आंध्रप्रदेशातील काही गावांना फोनी वादळाचा तडाखा बसला. या वादळात या तिन्ही राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले, परिणामी काही कुटुंब रस्त्यांवर तर काही लोकांना स्थलांतर करण्यात आले़ अशा बेघर झालेल्या लोकांना पैसे, कपडे, जेवण, संसारोपयोगी साहित्य आदी प्रकारची मदत विविध राज्यातून देण्यात येत आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातील गावे, शहरातील सामाजिक संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींकडून मिळणारी मदत रेल्वे विभागाकडून विनाभाडे संबंधित राज्यांना पोहच केली जाणार आहे. ही सुविधा ४ मे पासून सुरू करण्यात आली असून २ जूनपर्यंत ही सुविधा चालू राहणार आहे.
स्वतंत्र कोचमुळे जलद पोहोचणार मदत- फोनी वादळग्रस्तांसाठी पाठविण्यात येणाºया मदतीसाठी स्वतंत्र कोचची निर्मिती केली आहे़ जमा झालेले साहित्य नेहमीच्या दैनंदिन पार्सल व्हॅनमध्ये न पाठविता ही स्वतंत्र कोचमधून पाठविण्यात येणार आहे़ त्यामुळे वेळेत व जलदगतीने वादळग्रस्तांसाठीची मदत जलदगतीने पोहोचण्यास मदत होणार आहे़ या सामुग्रीवर कोणत्याही प्रकारचे शुल्क लावण्यात येणार नसल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी दिली़ तरी जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींनी वादळग्रस्तांसाठी मदत द्यावी असेही आवाहन हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केले आहे़
केरळपूरग्रस्तांसाठीही मदतीचा हात...- केरळच्या पूरग्रस्तांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून गेल्या पंधरा दिवसात ९.२६ टनाची औषधे, कपडे, अन्न अशा जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली होती़ केरळमध्ये पुरात लाखो घरे वाहून गेली़ असंख्य लोकांचा मृत्यू तसेच जनजीवन विस्कळीत झाले होते़ या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने रेल्वेच्या माध्यमातून मदत पोहोचविण्याचे काम हाती घेतले होते़ मानवतेच्या दृष्टिकोनातून रेल्वेनेदेखील अन्न, औषध, कापड आणि पाणी या साºया मदतीची वाहतूक ही मोफत केली होती़ त्यावेळी केरळ पूरग्रस्तांसाठी सोलापूर विभागाने जास्तीत जास्त मदत केली होती़ सोलापूर विभागातून ९,६०० कर्मचाºयांनी आपला पगार पूरग्रस्तांसाठी दिला होता़
देशांमधील सर्व सरकारी संस्था, सामाजिक संघटना यांच्याकडून मिळालेली साहित्यरूपातील मदत ओरिसा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश या राज्यांना रेल्वेकडून विनामूल्य पाठविण्यात येणार तरी सोलापूर मंडलातील स्वयंसेवी संस्था व इतर लोकांनी आपल्याकडील मदत साहित्य सोलापूर मंडल रेल्वे विभागाकडे जमा करून सहकार्य करावे़ ही सर्व मदत पार्सल व्हॅन यात्री गाडीने पाठविण्यात येणार आहे़ - प्रदीप हिरडेवरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर