बारामती : कुटुंबामध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. सुसंवादामुळे बऱ्याच प्रकारचे गुन्हे तुलनेने कमी होतील. मैत्रीचे ‘सर्कल’ चांगल्या विचारांचे ठेवा. शालेय दक्षता समिती स्थापन करून त्यामध्ये पालक-शिक्षक आणि संस्था प्रतिनिधींनी एकत्रित येणे गरजेचे आहे, असे मत अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजीराव चिखले यांनी व्यक्त केले.कृषी विकास प्रतिष्ठानच्या शारदा महिला संघ आणि बारामती ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कायदे महिलांसाठी व प्रतिसाद अॅप’ या कार्यक्रमात जनजागृती शिबिरात ते बोलत होते. या वेळी बचत गटातील महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.चिखले म्हणाले, की परिपूर्णता येण्यासाठी केवळ हुशारी असून चालत नाही, तर एकत्रित येणे गरजेचे आहे. छुपा कॅमेरा कोठेही असू शकतो, याची जाणीव ठेवा. या वेळी संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार म्हणाल्या, की महाविद्यालयामध्ये कोणत्याही मुलीने रॅगिंगचे प्रकार घडत असल्यास संस्थेच्या निदर्शनास आणून द्यावे. पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्या सांगाव्यात. या वेळी महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे यांनी हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह प्रतिबंधक, बलात्कार, गर्भपातविषयक कायदाबाबत माहिती दिली. प्रशांत निंबाळकर, प्रकाश साळुंके, श्रीकांत काटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रा. पुरी यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब नगरे यांनी आभार मानले.
कुटुंबात मुला-मुलींशी सुस
By admin | Published: June 29, 2016 1:18 AM